विद्यार्थिनीने विचारले, राजसाहेब हाताला मुंग्या चावल्या का?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

पत्रकार परिषषद आटोपून राज गर्दीच्या दिशेनं आले तेव्हा एका विद्यार्थिंनीने राज यांच्या हाताकडे पाहून म्हणाली, "राजसाहेब हाताला काय झालं ? तो खूप दुखतोय का ? त्यावर राज यांनी नाही असं उत्तर दिलं. तेवढ्यावर न थांबता ती म्हणाली, राजसाहेब हाताला मुंग्या चावल्या का? त्यावर राज गालात हसले आणि पुढे गेले. 
 

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे येणार असल्यानं सकाळपासूनच मुकुंदनगरमधल्या महाराष्ट्र मंडळाच्या कटारिया हायस्कूलमध्ये राज यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. यात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनीही होत्या.पत्रकार परिषषद आटोपून राज गर्दीच्या दिशेनं आले तेव्हा एका विद्यार्थिंनीने राज यांच्या हाताकडे पाहून म्हणाली, "राजसाहेब हाताला काय झालं ? तो खूप दुखतोय का ? त्यावर राज यांनी नाही असं उत्तर दिलं. तेवढ्यावर न थांबता ती म्हणाली, राजसाहेब हाताला मुंग्या चावल्या? त्यावर राज गालात हसले आणि पुढे गेले. 

आज बाळासाहेब असते तर, राज ठाकरे यांना झाली आठवण
न्यायालयात बाजू मांडत होता श्री रामाचा नेक्स्ट फ्रेंड 

हायस्कूलच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या वास्तुचे भूमिपूजन राज यांच्या हस्ते झाले. तेव्हाच अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्याचे स्वागत करीत राज यांनी आपली भूमिका मांडली.

राज यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर "सेल्फी'साठी त्यांच्या अनेकांनी धाव घेतली. त्यात एका विद्यार्थिनीने हाताबाबत विचारपूस करीत, विचारलेल्या प्रश्‍नांवर राज खूश झाले. 

राज ठाकरे यांना ग्रासले 'या' आजाराने; उपचार सुरू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray gave smile for students questions in Pune