Ayodhya Verdict : देशात रामराज्य यावे : राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

पुणे : ''अयोध्येत राम मंदीर उभारण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या धाडसी निकाल स्वागतार्ह असून, प्रत्यक्ष राम मंदीर उभारून रामराज्य यावे, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निकालानंतर व्यक्त केला. हा निकाल ऐकण्यासाठी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हवे होते,'' असेही राज म्हणाले. 

आज बाळासाहेब असते तर, राज ठाकरे यांना झाली आठवण
न्यायालयात बाजू मांडत होता श्री रामाचा नेक्स्ट फ्रेंड 

महाराष्ट्र मंडळाच्या कटारिया हायस्कूलच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या वास्तुचे भूमिपूजन राज यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी माध्यमाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. 

राज म्हणाले, "राम मंदीर उभारण्याच्या निर्णयामुळे कारसेवकांच्या बलिदानाला न्याय मिळाला आहे. ज्यासाठी इतका संघर्ष झाला त्याचे चीज झाले आहे. या निकालाने आनंद झाला असून, राम मंदिरासोबत देशात रामराज्य यावे, ही लोकांची अपेक्षा आहे. तीही पूर्ण व्हावी. यासंदर्भात न्यायालयाचे आभार मानावेत, तितके कमी आहेत.''दरम्यान, राज्यात सरकार स्थापनेबाबत विचारले असता ? त्यावर राज यांनी बोलणे टाळले.

 राज ठाकरे यांना ग्रासले 'या' आजाराने; उपचार सुरू
विद्यार्थिनीने विचारले, राजसाहेब हाताला मुंग्या चावल्या का?​

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray Give Statement about Ayodhya Verdict