राज यांच्या कुंचल्यातून साकारले अटलजी ! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे आर्ट पुणे हार्ट कला प्रदर्शनाचे उद्‌घाटन दीपप्रज्वलनाऐवजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे व्यंगचित्र रेखाटून केले. 

बालगंधर्व कलादालनात विश्‍वकर्मा ग्रुप आणि युवा स्पंदनच्या वतीने "पुणे आर्ट पुणे हार्ट' या कलाउत्सव चित्रकला प्रदर्शनाचे उद्‌घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्राध्यापक नरेंद्र विचारे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अनिल शिदोरे आदी उपस्थित होते. 

ठाकरे म्हणाले, "नवोदित चित्रकारांना कलादालनात प्रदर्शन भरविण्याची संधी मिळत नाही. नामांकित चित्रकारांसमवेत त्यांना प्रदर्शन भरवावे लागते. प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन यांची चित्रकार म्हणून करिअरची सुरवात वयाच्या साठाव्या वर्षी झाली. पिकासो या जगप्रसिद्ध चित्रकारासमवेत देशविदेशांतील चित्रकारांच्या प्रदर्शनात त्यांचे चित्र ठेवले असता "हे चित्र कोणी काढले' या प्रश्‍नातून ते प्रकाशात आले. तो त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला.'' 
 
Web Title: raj thakarey draw Sketch of former Prime Minister Atal Bihari Vajpayee.