महापालिकेच्या शाळेतील राज आर्यन 'जेईई मेन्स'मध्ये देशात अव्वल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

पुणे : सहकारनगर येथील महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये बारावीचे शिक्षण घेणाऱ्या राज आर्यन अग्रवाल याने जेईई मेन्स परीक्षेत 100 पर्सेन्टाईल मिळवित देशात अव्वल स्थान मिळविले आहे. 

पुणे : सहकारनगर येथील महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये बारावीचे शिक्षण घेणाऱ्या राज आर्यन अग्रवाल याने जेईई मेन्स परीक्षेत 100 पर्सेन्टाईल मिळवित देशात अव्वल स्थान मिळविले आहे. 

"महापालिकेच्या या शाळेत शिक्षणाबरोबरच उत्कृष्ट दर्जाचे कोचिंग मिळते म्हणून अकरावीला येथे प्रवेश घेतला'', असे राज आर्यन याने सांगितले. या शाळेत त्याने अकरावीला प्रवेश घेतला. राज आर्यनचे आठवीपर्यंतचे शिक्षण मॉस्कोमध्ये झाले आहे. त्यानंतर त्याचे पालक पुण्यात आले. त्यावेळी ऍमनोरा स्कूलमध्ये त्याने नववीला प्रवेश घेतला. मात्र दहावीची परीक्षा झाल्यानंतर त्याने अकरावीसाठी राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. 

"जेईई मेन्स परीक्षेत 100 पर्सेन्टाईल स्कोअर असल्याने खूप आनंद झाला आहे. आता जेईई ऍडव्हान्स परीक्षेचे वेध लागले आहेत. या परीक्षेतही चांगला स्कोअर व्हावा, हे ध्येय आहे. मला आयआयटी (मुंबई) मधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी. टेक करायचे आहे. कॉम्प्युटर सायन्समध्ये परदेशात नोकरीच्या चांगल्या संधी आहेत, तसेच नोकरीची सुरक्षा आहे, त्यामुळे ही विद्याशाखा महत्त्वाची वाटते.'' 
- राज आर्यन अग्रवाल, (100 पर्सेन्टाईल असलेला विद्यार्थी)  

Web Title: Raja Aryan of municipality School top in the country in 'JEE Mains'