पुणे : मार्केटयार्डात राजस्थानी गाजराचा हंगाम सुरू

Rajasthani carrot season begins in Pune market yard
Rajasthani carrot season begins in Pune market yard

मार्केट यार्ड : चवीला गोड असलेल्या राजस्थानातील गाजरांचा मार्केट यार्डात हंगाम सुरू झाला आहे. गाजर हलवा करण्यासाठी घरगुती ग्राहकांसह मिठाई व्यावसायिकांकडून गाजराला मोठी मागणी असते. राजस्थानातून पुण्यात येत असलेल्या गोड गाजरांना पुण्यासह स्थानिक भागातून मागणी आहे. त्याशिवाय पुण्याच्या मार्केट याडार्तून सांगली, कोल्हापूर, बेळगाव, गोवा येथे गाजरे विक्रीसाठी पाठविण्यात येत आहेत. किरकोळ बाजारात या गाजरांना किलोस ७० ते ८० रूपये भाव मिळत आहे.

धक्कादायक! राहत्या घरात आढळला मुलीचा मृतदेह, कारण अद्याप अस्पष्ट

सध्या राजस्थान येथून दररोज ५ ते ८ ट्रक इतकी गाजरांची आवक होत आहे. दर वर्षी साधारण नोंव्हेबर महिन्यापासून या गाजरांचा हंगाम सुरू होतो. हलव्यासाठी या राजस्थानी गाजरांना मागणी अधिक असते. सध्या घाऊक बाजारात दहा किलो गाजरांना ५०० ते ५५० रुपये असा भाव मिळत आहे. आवकेच्या तुलनेत मागणी चांगली असल्याने गाजराचे भाव सध्या तेजीत असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल घुले यांनी दिली.

राजस्थानी गाजर गोड असल्याने हलव्यासाठी मोठी मागणी असते. याशिवाय रंगाने पिवळसर व थोडी तुरट असलेल्या गाजरे महाराष्ट्र व मध्ये प्रदेश येथून पुण्याच्या बाजारात विक्रीसाठी येतात. ही गाजरे वर्षभर कमी जास्त प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असतात. मात्र, थंडीत सुरू होणारा राजस्थान येथील गाजरांचा हंगाम चार ते पाच महिन्यांसाठीच असतो.

Video:पबजी खेळून डोकं फिरलं, घटनेपेक्षा तरुणाचं नाव जास्त चर्चेत! 

थंडी सुरु झाली की बाजारात राजस्थानी गाजरांची आवक सुरु होते. बाजारात दाखल होत असलेल्या राजस्थानी गाजरांची प्रतवारी चांगली आहे. सध्या बाजारात कमी प्रमाणात आवक होत आहे. पुढील महिन्यात आवाक वाढून गाजराचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील असे घुले यांनी सांगितले. 

फुगेवाडी दुर्घटनेत ठेकेदाराचा निष्काळजीपणाच; अप्पर तहसीलदार कार्यालयाचा ठपका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com