बॅंक ऑफ महाराष्ट्रला ‘राजभाषा कीर्ति पुरस्कार’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

१४ सप्टेंबर हा हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो, त्यानिमित्त नवी दिल्लीच्या विज्ञान भवन येथे आयोजित एका भव्य समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  ए. एस. राजीव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुणे - कार्यालयीन कामकाजात हिंदी भाषेच्या अधिकाधिक केलेल्या वापराची दखल घेत बॅंक ऑफ महाराष्ट्रला ‘राजभाषा कीर्ति पुरस्कारा’ने सन्मानित केले. 

१४ सप्टेंबर हा हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो, त्यानिमित्त नवी दिल्लीच्या विज्ञान भवन येथे आयोजित एका भव्य समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  ए. एस. राजीव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह होते. या वेळी गृह राज्य मंत्री नित्यानंद राय, जी. किशन रेड्डी यांच्यासह अनेक सन्माननीय उपस्थित होते. या वेळी बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या दिल्ली अंचलचे प्रमुख आणि सरव्यवस्थापक प्रमोद दातार, सहायक सरव्यवस्थापक (राजभाषा) डॉ. राजेंद्र श्रीवास्तव आदी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajbhasha Kirti Award to Bank of Maharashtra