राजभवन आवारातून चंदनाची चोरी

बाबा तारे
बुधवार, 2 मे 2018

राज्यपालांचे निवासस्थान हे संवेदनशील परिसर असूनही चंदनाची झाडे चोरी झाल्याने सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. 

पुणे (औंध) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ व चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याजवळ असलेल्या राज्यपालांच्या 'राजभवन' निवासस्थानातील बागेतील चंदनाची चार झाडे कापून नेल्याची घटना काल(मंगळवारी) रात्री घडली. राज्यपालांचे निवासस्थान हे संवेदनशील परिसर असूनही चंदनाची झाडे चोरी झाल्याने सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. 

राजभवनचे सुरक्षा अधिकारी दिनेश देशपांडे यांनी चोरट्यांनी झाडे तोडून नेल्याची तक्रार चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दिली. राजभवनच्या आवारातून यापूर्वीही चंदनाच्या झाडांची चोरी झालेली होती.या ठिकाणी असलेली सुरक्षा  ही पुणे पोलीसांकडून पाहिली जाते .परंतु राजभवनच्या सुरक्षेसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यात आल्याचेही निदर्शनास आले आहे. राजभवनमधील अधिकाऱ्यांकडून पुणे पोलिस आयुक्तांना याबाबत बारा वेळा विनंती करणारी पत्रे पाठवण्यात आली. मात्र पुणे पोलिसांकडून प्रतिसाद मिळाला नाही. महत्त्वाचे म्हणजे राजभवनपासून अगदी हाकेच्या अंतरावर चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन आहे.

Web Title: Rajbhavan Premises Sandal Theft