राजे उमाजी नाईक हे आद्य क्रांतिकारक - हर्षवर्धन पाटील

डॉ. संदेश शहा
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

इंदापूर - भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजाविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील राजे उमाजी नाईक हे आद्य - क्रांतिकारक होते. त्यांच्या 
जीवनकार्याचा आदर्श घेवून मिळालेल्या स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी युवा- पिढीने सकारात्मक योगदान देणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन 
माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर रामोशी समाजास आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांचा पुर्णाकृती पुतळा भेट दिला. सदर पुतळ्याचे लोकार्पण हर्षवर्धन पाटील, नगराध्यक्षा अंकिता शहा, आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे प्रदेशाध्यक्ष वसंत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. मुकूंद शहा, सुनिल जाधव, आप्पासाहेब चव्हाण, संभाजी आडके, बंडू माने उपस्थित होते.

पाटील पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आदर्श घेवून उमाजी नाईक यांनी इंग्रजांना सलग १४ वर्षे सळो की पळो करून सोडले होते. पुरंदर किल्याच्या रक्षणाची जबाबदारी ही नाईक कुटूंबाकडे होती. इंग्रज, जुलमी सावकार व वतनदारांना लुटून ते गोरगरिबांना मदत करत असत. त्यामुळे क्रांतीकारकांचा आदर व स्मरण सर्वच जाती धर्मातील लोकांनी करून देश बलवान केला पाहिजे.

वसंत चव्हाण म्हणाले, स्वातंत्रपुर्व काळात देशद्रोहाचा खटला उमाजी नाईक यांच्याविरूध्द चालवून खडक- माळ आळी येथे त्यांना इंग्रजांनी फाशी दिली. मात्र इतिहासात उमाजी नाईक यांची दखल गांभीर्याने घेण्यात आली नाही. रामोशी समाजास मुख्य विकास प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण मिळणे गरजेचे आहे.

यावेळी अॅड. राहुल मखरे, कैलास कदम यांची भाषणे झाली. प्रास्ताविक सुखदेव चव्हाण तर सुत्रसंचलन बाळासाहेब चव्हाण यांनी केले. आभार भीमा जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी अॅड. किरण लोंढे, नानासाहेब चव्हाण, गणेश मदने, विजय भंडलकर, राहुल देवकर आदींनी प्रयत्न केले. 

Web Title: Raje Umaji Naik is the primary revolutionary - Harshavardhan Patil