पुण्यातील 'या' अधिकाऱ्याच्या कामाचे होतेय काैतुक अन् बढतीही

मंगळवार, 30 जून 2020

कोरोनाविरोधातील मोहिमेत बेजबाबदारपणाने कामे करणाऱ्या राज्य सरकारमधील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या असतानाच काही अधिकाऱ्यांना मात्र शाबासकीची थापही दिली आहे.

पुणे : कोरोनाविरोधातील मोहिमेत बेजबाबदारपणाने कामे करणाऱ्या राज्य सरकारमधील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या असतानाच काही अधिकाऱ्यांना मात्र शाबासकीची थापही दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पुणे महापालिकेतील उपायुक्त राजेंद्र मुठे यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून बढती दिली असून, त्यांच्यासह राज्यभरातील सहा अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. मुठे यांना बढती मिळाली असली; तरी सध्या ते पुणे महापालिकेतच काम करणार आहेत. 

पुणे महापालिकेच्या कामकाजासाठी मुठे यांची गरज असल्याचे सांगत, पुढील तीन महिने तरी ते महापालिकेतच असतील, असे राज्य सरकारमधील एका अधिकाऱ्यांने स्पष्ट केले. याआधी मुठे पुणे महापालिकेत आयातकर विभागाचे प्रमुख म्हणूनही काम पाहिले आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारच्या पथकांकडून शहरांमधील प्रशासकीय कामांचा आढावा घेण्यात आला आहे. त्यात काही अधिकारी कामचुकारपणा करीत नसल्याचे निरीक्षण एका पथकाच्या प्रमुखाने पुण्यात नोंदविले होते. त्यावरून बदल्या करण्याची मोहीम सरकारने हाती घेतली आहे. मात्र, पुण्यातील काही अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक करीत सरकारने त्यांना 'प्रमोशन' दिले आहे. त्यात मुठे यांचा समावेश आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सन 1999 मध्ये मुठे हे राज्य सरकारच्या सेवेत रुजू झाले. त्यानंतरच्या काळात मुठे हे मुख्यमंत्री कार्यालयात विशेष अधिकारी या पदासह पुण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सहकार आणि आदिवासी खात्यांच्या मंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून त्यांची जबाबदार पार पाडली आहे.

दरम्यान, त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची (बार्टी) कार्यभार त्यांच्याकडे मुठे यांच्याकडे होती. पुणे महापालिकेत सध्या मुठे यांच्याकडे कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष उभारण्यासह जिल्हा प्रशासनाशी समन्वयाची जबाबदारी आहे. पुण्यातील रुग्ण 40 हजाराच्या घरात जाण्याची भीती केंद्र सरकारच्या पथकाने मांडली, तेव्हाच सुमारे 30 ते 35 हजार बेडची सोय होईल, इतक्‍या प्रमाणात विलगीकरण कक्ष आणि कोविड केअर सेंटसची व्यवस्था मुठे यांनी केली आहे. सध्या स्वॅब क्‍लेशन सेंटर वाढविण्याचे काम त्यांच्याकडे आहे.