कौशल्य, रोजगार निर्मिती, उद्योजकतेला चालना देणार - राजेश टोपे

जिल्हा कार्यकारी समिती’ची स्थापना होणार
Rajesh Tope statement promote skills job creation and entrepreneurship District Executive Committee pune
Rajesh Tope statement promote skills job creation and entrepreneurship District Executive Committee pune E sakal

पुणे : कौशल्य विकास, रोजगार निर्मिती, उद्योजकतेबरोबर नाविन्यतेस प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा ‘कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती’ स्थापन करण्यात येणार आहे. याबाबत राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री राजेश टोपे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना आदेश दिला आहे. यानुसार जिल्हाधिकारी डॉ. देशमुख हेच या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे उपाध्यक्ष असतील, असे बुधवारी (ता.२२) जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.

या जिल्हास्तरीय समितीत दोन्ही महापालिकांचे आयुक्त, जिल्ह्यातील नगरपालिकेचे मुख्याधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, कृषी विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी, स्थानिक आयटीआयचे प्राचार्य, मागासवर्गीय विकास महामंडळ, उमेद अभियानाचे प्रतिनिधी, खाजगी इन्क्युबेशन सेंटरचे प्रतिनिधी, जिल्ह्यातील मान्यताप्राप्त स्टार्टअपचे प्रतिनिधी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आदींचा सदस्य म्हणून समावेश केला जाणार आहे. जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.

"जिल्ह्याच्या कौशल्य विकास आराखडा करणार"

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती पुणे जिल्ह्याचा कौशल्य विकास आणि नवीन संकल्पनांचा आराखडा तयार करणार आहे. या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारीसुध्दा या समितीकडे सोपविण्यात आली आहे. उद्योगकेंद्रित कुशल मनुष्यबळ निर्माण करणे आणि नवउद्योजक घडविणे हे या समितीचे मुख्य उद्दिष्ट्य असणार आहे.

"स्टार्टअप्सचा विकास करणार"

दरम्यान, 'स्टार्टअप्स'चा विकास करण्याची जबाबदारी ही या जिल्हा समितीकडे देण्यात आली आहे. यासाठी पुणे शहर व जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात आणि आयटीआयमध्ये नाविन्यता कक्षाची स्थापना केली जाणार आहे. या कक्षाच्या माध्यमातून शहर, जिल्ह्यातील नवउद्योजक तसेच स्टार्टअप्सना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.

या समितीमुळे होणारे संभाव्य फायदे

  • जिल्ह्याच्या खरेदी प्रक्रियेत स्टार्टअप्सना प्राधान्य मिळेल.

  • शहर, जिल्ह्यातील स्टार्टअप्सना क्वालिटी टेस्टिंग, पेटंटसाठी सहाय्य मिळू शकेल.

  • महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळणार.

  • प्रत्येक महाविद्यालयात महिला उद्योजकता कक्षाची स्थापना होणार.

  • महिलांना उद्योजकतेसाठी मार्गदर्शन व आवश्यक ते सहकार्य मिळू शकणार.

  • जिल्ह्यात कौशल्य व रोजगाराभिमुख, नाविन्यतेच्या योजनांचा प्रचार व प्रसारासाठी प्रोत्साहन मिळेल.

  • नाविण्येतेच्या योजनांच्या प्रसारासाठी गौरवपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना सन्मानपत्र देणार.

या समितीच्यावतीने शहर, जिल्ह्यातील मोठ्या उद्योगांशी चर्चा करणे, आयटीआयमध्ये सुसंगत प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम लागू करणे, कामगार बाजाराचा कल ओळखणे, रोजगाराची मागणी आणि पुरवठा यांचा आढावा घेणे, ग्रामीण स्तरावरील स्थानिक कौशल्ये तसेच नवीन संकल्पना शोधून त्यांना प्रोत्साहन देणे, महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी हिरकणीसारख्या कार्यक्रमाचे आयोजन करणे असे विविध उपक्रम राबविण्याबाबतचे नियोजन केले जाणार आहे. यासाठी या समितीची दर महिन्याला बैठक घेतली जाणार आहे.

- आयुष प्रसाद, उपाध्यक्ष, जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समिती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com