राजगुरूनगर - 15 ऑगस्टला बेपत्ता झालेल्या मुलाचा खून

राजेंद्र सांडभोर 
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

राजगुरूनगर - राजगुरुनगरमधून १५ ऑगस्ट रोजी बेपत्ता झालेल्या सुमित रविंद्र सावंत (वय १० वर्ष, रा. राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे) याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या आईशी असलेल्या अनैतिक संबंधांना अडथळा नको म्हणून, त्याच्या सख्ख्या आत्याच्या नवऱ्याने त्याला चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात ढकलून देऊन त्याचा खून केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. वसंत तुकाराम गोपाळे ( वय ४२, रा. चिखलगाव, ता. खेड, जि. पुणे) असे संशयित आरोपीचे नाव असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे आणि खेडचे पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी याबाबत माहिती दिली. याबाबत मुलाचे वडील रवींद्र चिंधू सावंत यांनी मुलास अज्ञात आरोपीने पळवून नेल्याची फिर्याद १६ ऑगस्ट रोजी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३६३ नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी याप्रकरणी तपास करीत असताना गोपाळे एकदा त्याठिकाणी येऊन मुलाला घेऊन गेला असल्याचे समजले. त्यांना संशय आल्यावरून त्यांनी १७ ऑगस्ट रोजी रात्री संशयित वसंत गोपाळे यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी करताना त्याने खुनाची कबुली दिली. राजगुरुनगरमधील 'माळ' या भागातून १५ ऑगस्ट रोजी दुपारी सुमितला दुचाकीवर नेले आणि सातकरस्थळ परिसरामध्ये चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात ढकलून दिले, असे त्याने पोलीस तपासात सांगितले. त्यानुसार शोध घेतल्यावर पोलिसांना रेटवडी गावाच्याजवळ कालव्यात सुमीतचा मृतदेह आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मिळाला. 

मृत सुमीतची आई सविताशी अनैतिक संबंध असल्याचे संशयित गोपाळे याने कबूल केले. त्या संबंधांना भविष्यात मुलाचा अडसर ठरेल म्हणून त्याने आणि तिने सुमीतच्या खुनाची योजना आखली आणि त्यानुसार संशयिताने खुनाचे कृत्य केले, असे त्याने सांगितले. पोलिसांनी अधिक तपासासाठी सवितालाही ताब्यात घेतले आहे. 

Web Title: Rajgurunagar - August 15 missing boy is dead