Crime News : स्वतःच्याच १६ वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या बापास जन्मठेप

वारंवार धमकी देत, स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती ठेवणाऱ्या, एका नराधम बापाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
Crime
Crimeesakal
Summary

वारंवार धमकी देत, स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती ठेवणाऱ्या, एका नराधम बापाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

राजगुरूनगर - वारंवार धमकी देत, स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला गर्भवती ठेवणाऱ्या, जुन्नर तालुक्यातील एका नराधम बापाला राजगुरुनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. अंबळकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

याबाबत थोडक्यात माहिती अशी की, जुन्नर तालुक्यातील एका गावात नोव्हेंबर २०१८ ते एप्रिल २०१९ या कालावधीत नराधम बापाने, स्वतःच्याच १६ वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार केला. मुलीची आई कामासाठी घरातून बाहेर पडल्यावर नराधम बाप घरी येत असे आणि मुलीसह तिच्या आईसही मारून टाकण्याची धमकी देत बलात्कार करीत असे. त्यातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने नराधमाचे दुष्कृत्य आईला समजले.

त्यानंतर आईने पीडित मुलीला बरोबर घेऊन नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

दरम्यान पीडित मुलीने यशवंतराव चव्हाण रुग्णालयात बाळाला जन्म दिला, पण ते मृत झाले. त्या अर्भकाचा, पीडित मुलीचा आणि आरोपी बापाचा डीएनए तपासण्यात आला. त्यातून आरोपीच पीडितेच्या मुलाचा बाप असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांना भक्कम पुरावा मिळाला.

या खटल्यात पीडित मुलगी, तिची आई, डॉक्टर व तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.

पवित्र नात्याला काळिमा फासणारा हा गुन्हा असल्याने आरोपीला दया दाखविण्यासारखी परिस्थिती नसून त्याला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. त्यावर न्यायाधीश ए. एम. अंबळकर यांनी आरोपीस बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार जन्मठेप व ५ हजार रुपये दंड ठोठावला. तसेच बलात्काराच्या गुन्हयाखाली १० वर्षे सश्रम कारावास आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com