राजीव गांधी कला-क्रीडा पुरस्कार जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

पुणे - वसंतदादा सेवा संस्था आणि प्रियांका महिला उद्योगातर्फे राजीव गांधी यांच्या स्मृतिनिमित्त लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना ‘राजीव गांधी कलागौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. बिहारचे माजी राज्यपाल डी. वाय. पाटील यांच्या हस्ते हा सन्मान २१ मे रोजी सायंकाळी सहा वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे, अशी माहिती संस्थेतर्फे संजय बालगुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बालगुडे म्हणाले, ‘‘क्रीडा आणि कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेतर्फे दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा कला क्षेत्रासाठीचा पुरस्कार पुणेकर यांना दिला जाईल. 

तसेच क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिलिंद गुंजाळ आणि आयपीएलच्या पुणे संघातील खेळाडू राहुल त्रिपाठी यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ३१ मे रोजी सायंकाळी सहा वाजता नेहरू स्टेडियम येथे होणार आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अभय आपटे यांच्या हस्ते हा सत्कार होणार आहे.’’

Web Title: Rajiv Gandhi Award