संगणक व अद्यावत तंत्रज्ञान क्रांती माजी पंतप्रधान (स्व) राजीव गांधी यांच्यामुळे झाली

ग्रहमंत्री वळसे-पाटील; मंचर येथे (स्व) राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
Rajiv Gandhi death anniversary
Rajiv Gandhi death anniversarySakal

मंचर - “माजी पंतप्रधान भारतरत्न (स्व) राजीव गांधी हे आपल्या देशातले एक मोठं नेतृत्व होते. माजी पंतप्रधान (स्व) इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर अचानकपणे आलेली जबाबदारी त्यांनी अतिशय समर्थपणे पार पाडली. संगणक क्षेत्रांमध्ये क्रांती करण्याचे काम त्यांनी केल्यामुळे सामान्य शेतकरी वर्गातील मुलांना संगणक, मोबाईल व टीव्हीच्या माध्यमातून जगातील ज्ञान प्राप्त होत आहे. नवीन पिढी व नवीन देश घडवण्याचे केलेले काम अविस्मरणीय आहे.” असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

मंचर (ता.आंबेगाव) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी (ता.२१) माजी पंतप्रधान भारतरत्न (स्व) राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेचे पूजन वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे, आदिवासी समाजाचे नेते सुभाषराव मोरमारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब बाणखेले, तहसीलदार राम जोशी, लाला बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले यांनी अभिवादन केले. याप्रसंगी दत्ता थोरात, मंगेश बाणखेले, प्रवीण मोराडे, सुरेश निघोट, सरपंच नवनाथ निघोट, राजाबाबू थोरात, सुषमा शिंदे, जे.के.थोरात,अरुणा टेके उपस्थित होत्या.

वळसे पाटील म्हणाले “दुर्दैवाने केंद्रात सत्तेमध्ये बसलेले लोक वेगवेगळे भावनात्मक प्रश्न तयार करून समाजा समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल ? अंतर कसे निर्माण होईल ? असा प्रयत्न सुरू आहे. याच पद्धतीने देश जर चालत राहिला तर तर मी आपल्याला समाजा समाजामध्ये अंतर कसे निर्माण होईल असा प्रयत्न चालू आहे याच पद्धतीने चालत राहिला तर मी आपल्याला सांगतो उद्या च्या काळात अन्य देशात जे चित्र पाहत आहोत तसे चित्र उभे राहिल्या शिवाय राहणार नाही. देश एकसंघ राहण्यासाठी, राजीव गांधी यांचा विचार व आदर्शाची जपणूक सर्वांनी केली पाहिजे.” मंचर शहर राष्ट्र्वादी कॉंग्रेसचे अध्यक्ष सुहास बाणखेले यांनी प्रास्ताविक केले. लक्ष्मण थोरात भक्ते यांनी आभार व कामगार नेते अँड बाळासाहेब बाणखेले यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com