मला किरण बेदीच व्हायचंय..!

भरत पचंगे
सोमवार, 25 जून 2018

शिक्रापूर (पुणे): निवृत्त आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचेसारखेच आयपीएस अधिकारी होण्याची आकांक्षा बाळगणारी राजलक्ष्मी विश्वास विधाटे हिने आपले राहणीमान अगदी इयत्ता चौथीपासून किरण बेदींसारखेच ठेवले असून तिची हेअरस्टाईलही तिला स्वत:तील किरण बेंदींचा फिल देतेय असे ती आवर्जून सांगतेय. अर्थात ’मी तशीच होणार’ असे म्हणून राजलक्ष्मीचा सध्या इयत्ता दहावीत असताना चाललेला ’सेल्फस्टडी’ या भागात कौतुकाचा विषय आहे.

स्वयंअध्ययनाच्या जोरावर महाराष्ट्र बुध्दीमत्ता संशोधन स्पर्धेत (एमटीएस) येथील राजलक्ष्मीने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. इयत्ता चौथी व सातवीची परीक्षेत या पूर्वी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावलेल्या राजलक्ष्मी सध्या इयत्ता दहावीत असून तिचे स्वप्न आयएएस अधिकारी होण्याचे आहे.

कुठलीही विशेष खाजगी शिकवणी नाही, विशेष मार्गदर्शन नाही तरीही येथील राजलक्ष्मी गेल्या काही वर्षात विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम गुणांनी यशस्वी होत आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र बुध्दीमत्ता संशोधन स्पर्धेत (Maharashtra Talent Search Examination) तिने 200 पैकी 140 गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. केंदूर (ता. शिरूर) येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील राजलक्ष्मीने सन 2012 मधील इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत 300 पैकी 292 गुण मिळवून राज्यात तिसरा तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. पुढे सन 2015 मध्ये इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत तिने 300 पैकी 242 गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. जेमतेम सामान्य शेतकरी कुटुंब, वडील विश्वास विधाटे हे एका खाजगी कंपनीत कामाला तर चुलते मोहन विधाटे हे प्राथमिक शिक्षक. या दोघांच्या जेमतेम मार्गदर्शनाखाली ती मिळवित असलेले यश येथील विद्याधाम प्रशालेसाठीही भूषणावह असल्याची प्रतिक्रिया विद्याधामचे शिक्षक एस. के. खटके यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajlaxmi vidhate mts examination pass and her dream ips kiran bedi