राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत एनडीएचा 137वा दिक्षान्त समारंभ साजरा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

पुणे : संरक्षण क्षेत्रातील पदवी परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या भावी लष्करी अधिकाऱयाच्या देहबोलीत भरलेला एक विलक्षण उत्साह... देशसेवाचा ध्यास... अन् निनादणाऱ्या देशभक्तीपर गीतांच्या धैर्यवधक वातावरणात एनडीएच्या 137 व्या तुकडीची पासिंग आउट परेड पार पडली. तीन सुखोई-30 लढावू विमाने आणि हेलिकॅाप्टरने आकाशात क्षणात घेतलेली भरारी डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. 

पुणे : संरक्षण क्षेत्रातील पदवी परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या भावी लष्करी अधिकाऱयाच्या देहबोलीत भरलेला एक विलक्षण उत्साह... देशसेवाचा ध्यास... अन् निनादणाऱ्या देशभक्तीपर गीतांच्या धैर्यवधक वातावरणात एनडीएच्या 137 व्या तुकडीची पासिंग आउट परेड पार पडली. तीन सुखोई-30 लढावू विमाने आणि हेलिकॅाप्टरने आकाशात क्षणात घेतलेली भरारी डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. 

Image may contain: sky, cloud and outdoor

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) खेत्रपाल परेड ग्राउडवरचं वातावरण शनिवारी सकाळी केवळ डोळ्यांत साठवून घ्यावं, असंच होतं! प्रत्येक विद्यार्थी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. गेल्या तीन वर्षांत शिकलेल्या ज्ञान, शिस्त, कौशल्यांची चूणूक दाखविण्याची ही वेळ होती. विद्यार्थ्यांच्या चित्तवेधक परेडने उपस्थितांना थक्क करून सोडले. या सगळ्यावर वरकडी केली ती विद्यार्थ्यांच्या जल्लोषाने. प्रत्येक जण आपल्या बॅचमेटसोबत सेल्फी काढण्यात मग्न झाला होता.

Image may contain: 4 people, people standing and outdoor

देशाचा अभिमान असणारी एनडीए या परेडसाठी पहाटेपासूनच सज्ज झाली होती. काहीसं उजाडल्यानंतरच्या हलक्‍याशा गारव्यात या परिसरातील वास्तू आणि आसमंत अधिकच लक्षवेधी वाटत होता. अशा वेळी परेडचा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसह नागरिकांच्या वाहनांनी रस्ते भरून गेले होते. 
माझी गिरीधर हा विद्यार्थी प्रेसिडेंट्‌स सुवर्णपदकाचा मानकरी ठरला, तर कुशाग्र मिश्रा हा रौप्यपदक आणि निशांतकुमार विश्वकर्मा हा ब्राँझपदक विजेता ठरला. त्यांना 
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Image may contain: one or more people, people riding horses, people standing, horse, sky, crowd and outdoor

यावेळी एनडीएचे कमांडंट एयर मार्शल आय. पी. विपीन, रिअर अॅडमिरल एस. के. ग्रेवाल, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे जनरल कमांडिंग ऑफिसर इन चीफ लेफ्टनंट जनरल एस. के सैनी, लेफ्टनंट जनरल सत्येंद्रकुमार सिंह, प्राचार्य डॉ. ओमप्रकाश शुक्‍ला या वेळी उपस्थित होते.

Image may contain: 2 people, people standing and outdoor

एनडीएच्या 137 व्या तुकडीतील एकूण 285 जणांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले. सुखोई 30 अन् सारंगचा थरारपरेड सुरू होताना उंच आकाशात सूर मारत झेपावणारी हेलिकॉप्टर आणि सुखोई ही खास विमानं पाहताना उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं.सारंग हेलिकॉप्टर्सची थरारक प्रात्यक्षिके पाहताना अनेकांच्या नजरा एका क्षणी स्थिर झाल्या होत्या. परेडच्या देखण्या पार्श्वभूमीवर सतत बँडच्या सुरेल तालावर ऐकू येणाऱ्या ‘हम एनडीए के कॅडेट हैं’... ‘सारे जहाँ से अच्छा’... ‘देशो का सरताज भारत’... या धून ऐकताना मन प्रसन्न होत होतं.

Image may contain: 3 people, outdoor

चारचाकीतून स्वीकारली सलामी !
घोड्यांच्या पारंपरिक बग्गीमधून प्रमुख पाहुणे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे आगमन झालं. उपस्थितांच्या नजरा या विशेष आगमनाकडे लागून राहिल्या होत्या. मंचावर आल्यानंतर सिंह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्याआधी त्यांनी संपूर्ण परेडची सलामी एका खास चारचाकीतून जात स्वीकारली. परेड संपल्यानंतर सिंह व इतर अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची भेटही घेतली.

Image may contain: one or more people, people standing, crowd and outdoor
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajnath Singh attends passing out parade of 137th course of NDA