आधी शरद पवार यांच्यासोबत लंच डिप्लोमसी; आता राजू शेट्टींचा बारामतीत मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 August 2020

बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमवेत राजू शेट्टी यांच्या लंच डिप्लोमसीनंतर वातावरण बदलून गेले होते. राष्ट्रवादीच्या कोट्यातून राजू शेट्टी यांना विधानपरिषदेवर घेण्याचा निर्णय स्वत: शरद पवार यांनी घेतला होता.

बारामती : माजी खासदार राजू शेट्टी 27 ऑगस्ट रोजी बारामतीत दूध दरवाढीसाठी जनावरांसहीत मोर्चा काढून आंदोलन छेडणार आहेत.

खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला

बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमवेत राजू शेट्टी यांच्या लंच डिप्लोमसीनंतर वातावरण बदलून गेले होते. राष्ट्रवादीच्या कोट्यातून राजू शेट्टी यांना विधानपरिषदेवर घेण्याचा निर्णय स्वत: शरद पवार यांनी घेतला होता. त्यामुळे पवार व शेट्टी यांच्या दिलजमाई झाली, असेच चित्र राज्यासमोर उभे राहिले होते. 

साखर पट्टयात राजू शेट्टी यांनी स्वाभिमानीच्या माध्यमातून अनेक आंदोलने उभी करत पवार यांना शह देण्याचा प्रयत्न केला होता. अनेकदा साखर कारखान्यांचे गाळपही बंद पाडले होते. मात्र राजू शेट्टी यांनी शरद पवार यांची विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर स्विकारल्यानंतर हे संबंध मधुर झाल्याचे चित्र होते. 

Swabhimani Shetkari Sanghatana exits NDA

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्यात शरद पवार यांचीच महत्वाची भूमिका होती, या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी बारामतीत येत दूध दरासाठी आंदोलन करणार असल्याने पुन्हा एकदा सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

छोट्या आकाराचा सुखकर्ता ठरले मोठ्या आकाराचा विघ्नहर्ता

या संदर्भात राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ''दूध दरवाढीसाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात मोर्चांची मालिकाच सुरु केली आहे. दोन दिवसांपूर्वी सोलापूरला हे आंदोलन झाले, उद्या नगरला असे आंदोलन होणार आहे, त्यालाही मी उपस्थित राहणार आहे. 24 ऑगस्ट रोजी सातारा येथे मोर्चा होणार आहे. पुणे जिल्ह्याचा मोर्चा आम्ही पुणे शहर वगळून बारामतीत घ्यायचा निर्णय घेतला आहे. पुणे शहरात जनावरांसह मोर्चा काढण्याने लोकांची अडचण होणार असल्याने आम्ही बारामतीत हा मोर्चा काढणार आहोत. शेतकरी दुधाचे भाव कमी झाल्याने हवालदिल झाले आहेत, त्या मुळे या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन सुरु आहे.'' 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raju Shetty will march in Baramati for milk price hike