मांज्यात अडकलेल्या पक्ष्याला मिळाले जीवदान 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

पुणे- लक्ष्मीनगर परिसरातील रमणा गणपती मंदिरासमोर असलेल्या एका मोठ्या झाडावर राखी धनेश हा पक्षी मांज्यात अडकला होता. दोन तासांच्या प्रयत्नानंतर त्याचा जीव वाचविण्यात पक्षिप्रेमी आणि अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. 

लक्ष्मीनगर परिसरातून जाणाऱ्या एका निसर्गप्रेमीने मांज्यात अडकलेल्या धनेशला पाहिले आणि त्याला सोडविण्यासाठी हालचाली सुरू केल्या. आकाश चिनके, कृष्णा ताजवेकर, सिद्धांत माने, अतुल भिसे, अमित पुणेकर, अमित पायगुडे, आशिष पाठक यांनी तत्परता दाखवून "बायोस्फिअर्स'चे संस्थापक डॉ. सचिन पुणेकर यांना ही माहिती दिली आणि अग्निशामक दलाशी संपर्क साधला. त्यानंतर दलाच्या जवानांनी 60 ते 65 फुटांवर असणाऱ्या फांदीवरून त्या पक्ष्याचे प्राण वाचविले. यात प्रकाश गोरे, राजाराम केदारी, हनुमंत कोळी, शंकर नाईकनवरे, लक्ष्मण घवाळी यांनी सहकार्य केले. मांज्यात अडकल्यामुळे धनेश पक्षी जखमी झाला असून, उपचारासाठी त्याला कात्रज येथील वन्यजीव अनाथालयात दाखल केल्याचे डॉ. पुणेकर यांनी सांगितले.

Web Title: rakhi dhanesh bird