पाणीप्रश्‍नी भाजपला घरचा आहेर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

तळेगाव दाभाडे - विस्कळित पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ जनसेवा विकास समितीच्या वतीने नगर परिषदेवर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. भाजप महायुतीतील सत्तेतील सहभागी जनसेवा विकास समितीने पाणी प्रश्नावर मोर्चा काढून भाजपला घरचा आहेर दिला आहे.

जनसेवा विकास समितीच्या विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे यांचे नेतृत्वाखाली स्टेशन विभागातून मोर्चा काढण्यात आला. त्यात समितीचे नगरसेवक गणेश खांडगे, संग्राम काकडे, रोहित लांघे, सचिन टकले, सुलोचना आवारे, अनिता पवार यासह सुमित्रा चोरघे सहभागी झाले होते. नगर परिषदेत आल्यावर महिलांनी घोषणाबाजी केली. 

संतप्त महिलांनी नगराध्यक्ष चित्रा जगनाडे व उपनगराध्यक्ष तथा पाणी समितीचे सभापती सुनील शेळके यांच्या दालनामध्ये मोकळी मडकी फोडली. या वेळी काही काळ तणावाचे वातावरण होते. मोर्चातील सहभागी संतप्त महिला कार्यालयात आल्यावर त्यांना अडविण्यासाठी मोजक्‍या महिला पोलिस कर्मचारी होते. त्यामुळे पोलिस निरीक्षक मुगुट पाटील यांची काहीशी पंचायत झाली. 

नगरसेवक गणेश खांडगे यांनी पाणीपट्टीची आकारणी सारखी करता मग पाणी पुरवठ्याबाबत स्टेशन विभागावरच अन्याय का, असा सवाल करत अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन वेळीच प्रभागनिहाय योग्य नियोजन करावे. महिला दिनापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करावा. प्रश्न वेळेत न सुटल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला. माजी नगराध्यक्षा व जनसेवा विकास समितीच्या विद्यमान ज्येष्ठ नगरसेविका सुलोचना आवारे यांनी पाणीप्रश्न महिलांच्या जिव्हाळ्याचा असून, हा प्रश्न प्राधान्याने सोडवावा; अन्यथा त्यांनी खुर्च्या खाली कराव्यात, अशा शब्दांत संताप व्यक्त केला.
विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे यांनी केवळ तात्पुरती मलमपट्टी नको; प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी. आतापर्यंत आश्वासने दिली, आता कृती करावी व पाणी प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली.

मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी पाणी प्रश्नावर महिलांच्या तीव्र भावनांची आपणाला जाणीव असून, या प्रश्नाला प्राधान्य देण्यात आले आहे, असे सांगितले.

Web Title: rally on water issue