नाटक तर गुणगौरव करणारे - जयंत सावरकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

पुणे - ""नाटककार राम गणेश गडकरी यांनी लिहिलेले "राजसंन्यास' हे नाटक छत्रपती संभाजीराजांची स्तुती करणारे, गुणगौरव करणारे आहे. जे या नाटकाचा विरोध करत आहेत, त्यांनी हे नाटक पाहिले किंवा किमान वाचले तरी आहे का?'' असा सवाल नियोजित नाट्य संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांनी मंगळवारी उपस्थित केला. 

"राजसंन्यास'मध्ये संभाजीराजांबद्दल आक्षेपार्ह मुद्दे आहेत, असे सांगत गडकरी यांचा पुतळा काही कार्यकर्त्यांनी मध्यरात्री काढून टाकला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या नाटकात पूर्वी भूमिका केलेले सावरकर म्हणाले, ""ही घटना मी ऐकली, त्या वेळी मन संतापाने पेटून उठले. कारण या नाटकात आक्षेपार्ह म्हणावे, असे काही नाही. खरंतर हे नाटक संभाजी महाराजांचा गुणगौरव करणारे आहे. स्तुतिपर नाटक म्हणावे, तसे ते आहे. एक-एक वाक्‍य वाचताना किंवा ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. इतकी ताकद गडकरींच्या शब्दांत आहे.'' 

गडकरी यांनी अखेरच्या दिवसांत हे नाटक लिहिले होते. या नाटकात मी स्वत: भूमिका केली आहे. चित्तरंजन कोल्हटकर, प्रसाद सावकार, मामा पेंडसे अशा मान्यवरांनीही यात भूमिका साकारल्या आहेत. पूर्वी या नाटकाचे प्रयोग व्हायचे, असे सांगून सावरकर म्हणाले, ""जातीय तेढ वाढवण्यासाठी, राजकीय फायदा उचलण्यासाठी असे वाद उकरून काढले जातात; पण अशा वादात लेखक-कलावंतांना ओढून त्यांचे जीवन खराब करू नका, असे माझे सांगणे आहे.'' 

राजसंन्यास'मध्ये गडकरी यांनी केलेले काही लेखन चुकीचे असेल तर त्याचा विरोध घटनेच्या चौकटीत राहून करता येऊ शकतो; पण आज घडलेला हा प्रकार विकृत आणि निषेधार्हच आहे. 
- डॉ. श्रीपाल सबनीस, संमेलनाध्यक्ष

Web Title: ram gadkari statue issue jayant sawarkar