गडकरींचा पुतळा नदीपात्रात सापडला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

पुणे - नाटककार राम गणेश गडकरी यांचा संभाजी उद्यानातील पुतळा आज (बुधवार) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुठा नदीपात्रात सापडला. काल संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा उखडून नदीत फेकून दिला होता.

याप्रकरणी पकडलेल्या संशयितांना घेऊन पोलिस आज दुपारी उद्यानात आले. त्यांनी जागा दाखवून दिली. संभाजी उद्यानाच्या मागील बाजूस नदीपात्रात हा पुतळा टाकण्यात आला होता.

त्यानंतर नदीकाठी राहणाऱ्या काही तरुणांना पाण्यात उतरवून पोलिसांनी हा पुतळा बाहेर काढला. त्यानंतर ब्लँकेटमध्ये गुंडाळून हा पुतळा महापालिकेच्या वाहनातून डेक्कन पोलिस ठाण्यात नेण्यात आला.
 
Web Title: ram ganesh gadkari's statue recovered