राम जाधव यांना शौर्यपदक; अन्य सहा पोलिसांना राष्ट्रपती पदक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

पिंपरी चिंचवडमधील सहायक आयुक्त राम जाधव यांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक जाहीर झाले आहे. तर, शहर-जिल्ह्यातील सहा पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. जाधव यांची या पूर्वी पुण्यात नियुक्ती होती. त्या कामगिरीबद्दल त्यांना पदक जाहीर झाले आहे.

पुणे : पिंपरी चिंचवडमधील सहायक आयुक्त राम जाधव यांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक जाहीर झाले आहे. तर, शहर-जिल्ह्यातील सहा पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. जाधव यांची या पूर्वी पुण्यात नियुक्ती होती. त्या कामगिरीबद्दल त्यांना पदक जाहीर झाले आहे.

गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पदक मिळालेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे ः दिलीप बोरास्ते (उपअधीक्षक- लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, पुणे), निरीक्षक राजेंद्र पोळ (गुन्हे शाखा, पुणे शहर), मनोहर चिंतेल्लू (सहायक फौजदार- विशेष शाखा, पुणे शहर), दत्तात्रेय जगताप (सहायक फौजदार - गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण), अविनाश जगताप (सहायक फौजदार, विशेष शाखा, पुणे शहर) आणि बाळू भोई (हवालदार, पुणे ग्रामीण).राजेंद्र कदम (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा, पुणे शहर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ram Jadhav awarded the gallantry and Presidents medal for the other six police