शेतकऱ्यांना आले 'अच्छे दिन'; भाजपचे आमदार राम कदम यांचा दावा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

राज्यातील 21 हजार दुष्काळग्रस्त गावांपैकी 11 हजार 465 गावे दुष्काळमुक्त करण्यात सरकारला यश आले आहे. जलयुक्त शिवार, पीकविमा, मुबलक वीज यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने 'अच्छे दिन' आले आहेत. शेतकरी आत्महत्या हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पाप असून, आत्महत्यामुक्त महाराष्ट्र हे भाजपचे उद्दिष्ट आहे, असे भारतीय जनता पक्षाचे आमदार यांनी सांगितले.

भिगवण - राज्यातील 21 हजार दुष्काळग्रस्त गावांपैकी 11 हजार 465 गावे दुष्काळमुक्त करण्यात सरकारला यश आले आहे. जलयुक्त शिवार, पीकविमा, मुबलक वीज यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने 'अच्छे दिन' आले आहेत. शेतकरी आत्महत्या हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे पाप असून, आत्महत्यामुक्त महाराष्ट्र हे भाजपचे उद्दिष्ट आहे, असे भारतीय जनता पक्षाचे आमदार यांनी सांगितले.

शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्‍यातील पक्ष कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी मारुती वणवे, दिलीप खैरे, बाळासाहेब गावडे, अशोक वणवे, नानासाहेब शेंडे, बाबासाहेब चवरे, माउली चवरे, रामचंद्र निंबाळकर उपस्थित होते. कदम म्हणाले, 'अडचणीत असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना कजर्माफी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जास्तीत जास्त शेतकरी कजमुक्तीच्या कक्षेत आणण्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. सध्या राज्यात सुरू असलेले आंदोलन हे खऱ्या शेतकऱ्यांचे नाही, तर शेतकऱ्यांच्या आडून 2019 च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काँग्रेस-राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. राज्यातील बहुतांश डेअऱ्या या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत; मग शेतकऱ्याच्या दुधाला हे का भाव देत नाही, असा सवाल उपस्थित करत त्यांचा शेतकऱ्यांविषयी असलेला कळवळा हा बेगडी आहे.'

विविध महामंडळांकडून कर्ज घेतलेल्या थकीत शेतकऱ्यांचाही कजर्माफीबाबत सरकारने विचार करावा, अशी भूमिका युवराज म्हस्के यांनी मांडली. बाबासाहेब चवरे म्हणाले, 'सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कजर्माफीच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी. कर्जवसुलीसाठी बॅंकांना तगादा लावू नये, अशा सूचना द्याव्यात.'

Web Title: ram kadam bhigwan news pune news marathi news maharashtra news bjp