विरोधकांमुळेच राम मंदिराचा प्रश्‍न प्रलंबित - डॉ. परीक्षित शेवडे

माणिकबाग - परशुराम सेवा संघाच्या वतीने डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थित मान्यवर.
माणिकबाग - परशुराम सेवा संघाच्या वतीने डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थित मान्यवर.

सिंहगड रस्ता - रामजन्मभूमी उत्खननात राम मंदिर असल्याचे अनेक पुरावे सापडले आहेत. पण, तरीही या प्रकरणी न्याय मिळण्यास विलंब होत आहे. विरोधकांकडून वेळकाढूपणा होत असून, इतकी वर्षे जो प्रश्‍न सुटला नाही; तो मध्यस्थीने कसा सुटेल, असा सवाल व्याख्याते डॉ. परीक्षित शेवडे यांनी उपस्थित केला.

परशुराम सेवा संघाच्या वतीने ‘राम मंदिरच का?’ या विषयावर आंतरराष्ट्रीय व्याख्याते सच्चिदानंद शेवडे आणि डॉ. परीक्षित शेवडे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. माणिकबाग येथील सिद्धार्थ हॉल येथे हा कार्यक्रम झाला. या वेळी ‘जमात ए पुरोगामी’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, आपुलकी पुणेच्या संचालिका प्राजक्ता रूपदे, दक्षिण पूर्व एशिया गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधत्व करणारा रोलर आणि आइस स्केटिंग करणारा ओजस कुलकर्णी, बालकलाकार सानिका कुलकर्णी, पोलिस कर्मचारी अभय देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ कुचिक, नगरसेविका मंजूषा नागपुरे, नगरसेवक प्रसन्न जगताप, शिवसमर्थ प्रतिष्ठानचे दीपक नागपुरे, परशुराम सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अनिल मुळे, प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित देशपांडे, जिल्हाध्यक्ष हृषीकेश सुमंत, शहराध्यक्ष निर्मल देशपांडे आदी उपस्थित होते. हिंदू समाज सहिष्णू असल्याने ‘जमात ए पुरोगामी’कडून हिंदूंच्या श्रद्धांविषयी शंका निर्माण केली जाते. हिंदूंच्या श्रद्धा नष्ट करू पाहणारे हे विचारवंत आहेत, असे मत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी व्यक्त केले.

रामजन्मभूमीची तसूभरही जमीन देणार नसल्याची भूमिका हिंदू पक्षकारांनी घ्यायला हवी, अशी अपेक्षा देशपांडे यांनी व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वितेसाठी वैभव कुलकर्णी, संकेत जोशी, महेश देशपांडे, रोहित मांडके, सागर मांडके, अजय पोतदार, हर्शल देशपांडे, दत्तात्रय देशपांडे, उदय देशपांडे, उपेंद्र जपे, अमित देशपांडे, समीर बर्वे, अमृता कुलकर्णी, ज्योती पाठक, मृदुल कुंभोजकर, अंजली कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com