राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पुण्याचा रमणदिपला कांस्य पदक

रमेश मोरे
शनिवार, 23 जून 2018

सांगवी : भारतीय कुस्ती महासंघाच्या वतीने उत्तर प्रदेश, मेरठ येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत जुनी सांगवी येथील रमणदिप विक्रमसिंग संधु हिने कांस्यपदक पटकावले.  १५ जून ते १७ जून २०१८ दरम्यान मेरठ येथे पार पडलेल्या १५ वर्षाखालील मुलींच्या ६२ किलो वजनी गटात रमणदिपणे महिला फ्री स्टाईल प्रकारात कांस्यपदक पटकाविले. त्याबद्दल नगरसेवक हर्षल ढोरे व बालाजी महिला प्रतिष्ठानच्या वतीने तिचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

लखनऊ येथे पार पडणाऱ्या इंडिया कॅम्पसाठी रमणदिपची महाराष्ट्रातून निवड झाली असून या स्पर्धेतुनच पुढे एशियन चॅम्पियनशिपसाठी निवड होत असते.  सह्याद्री नॅशनल स्कूल मध्ये इयत्ता नववीत शिक्षण घेत असलेल्या रमणदिपला वारजे माळवाडी येथील सह्याद्री कुस्ती संकुलात वस्ताद विजयकाका बराटे यांच्या मार्गदर्शनाखाली रमणदिप सराव करते. संदीप पठारे, दिलीप पडवळ, अश्विनी बोऱ्हाडे, माधुरी घराळ, परीक्षित पाटील, निलेश पाटील, संदीप शर्मा, श्रेयानंद धय्या, अमित शर्मा, नरेंद्र कुमार आदींचे रमणदिपला सहकार्य मिळत आहे.

जुनी सांगवी येथील सामान्य कुटुंबातील असलेल्या रमणदिपचे वडील विक्रमसिंग वाहनचालक म्हणून काम करतात तर आई गृहिणी आहे.

माझ्या पाठीशी आई बाबांचा आशिर्वाद, सांगवीकरांचे प्रेम व उत्साह आहे. माझे देशासाठी खेळायचे स्वप्न आहे.
- रमणदिप संधु

Web Title: Ramandeep got Bronze medal in National Wrestling Championship