esakal | Vidhan Sabha 2019 : रामदास आठवलेंनी सिद्धार्थ शिरोळेंना दिल्या काव्यात्मक शुभेच्छा 
sakal

बोलून बातमी शोधा

ramdas-aathvale.jpg

पुणे : पुणे शहरात सध्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले असताना केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या चारोळ्यांनी रंगत चढवली. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यासह महायुतीचे आम्ही सर्व नेते तुझ्या पाठीशी आहोत. आम्ही सगळे आहोत तुझ्या पाठीशी, विजय आहे तुझ्या गाठीशी,” अशा शब्दांत रामदास आठवले यांनी शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजपा-शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना काव्यातून शुभेच्छा दिल्या.

Vidhan Sabha 2019 : रामदास आठवलेंनी सिद्धार्थ शिरोळेंना दिल्या काव्यात्मक शुभेच्छा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहरात सध्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले असताना केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या चारोळ्यांनी रंगत चढवली. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यासह महायुतीचे आम्ही सर्व नेते तुझ्या पाठीशी आहोत. आम्ही सगळे आहोत तुझ्या पाठीशी, विजय आहे तुझ्या गाठीशी,” अशा शब्दांत रामदास आठवले यांनी शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजपा-शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना काव्यातून शुभेच्छा दिल्या.

रामदास आठवले आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत सिद्धार्थ शिरोळेंच्या प्रचारासाठी औंध ते खडकी बाजार अशा मोटारसायकल रॅलीचे आयोजन मंगळवारी सायंकाळी करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी भाजपा शहर उपाध्यक्ष दत्ता खाडे, चिंतन शहा, नगरसेवक सुरेश कांबळे, नगरसेविका सुनीता वाडेकर, कमलेश चासकर, कार्तिकी हिवरकर, मुकेश गवळी, परशुराम वाडेकर, विलास पंगुडवाले, शाम काची, सुरेंद्र जी भाटी, अमित बिवाल, अमर देशपांडे, दादा कचरे, योगेश कणनायर, दत्ता सावंत, अजित पवार उपस्थित होते.  

loading image