नेत्यांची अवस्था पुरातल्या ओंडक्‍यासारखी - फुटाणे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

पुणे - ""राजकीय मटेरिअल सगळीकडे सारखे आहे. सगळ्यांची अवस्था गोंधळलेले आणि पुरातल्या ओंडक्‍यासारखी झाली आहे. कुठे जाऊन धडकतील, काही सांगता येत नाही,'' अशा शब्दांत ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी राजकीय अवस्थेवर भाष्य केले. 

पुणे - ""राजकीय मटेरिअल सगळीकडे सारखे आहे. सगळ्यांची अवस्था गोंधळलेले आणि पुरातल्या ओंडक्‍यासारखी झाली आहे. कुठे जाऊन धडकतील, काही सांगता येत नाही,'' अशा शब्दांत ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी राजकीय अवस्थेवर भाष्य केले. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म दिनानिमित्त संवादतर्फे फुटाणे यांच्या हस्ते कवी संदीप खरे आणि सुधीर मुळीक यांना "मार्मिक पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. दरम्यान, कविता आणि वात्रटिकांची मैफल रंगली. त्यात पुरस्कारार्थींसह रानकवी तुकाराम धांडे, कवी कल्पना दुधाळ यांनी वैविध्यपूर्ण कवितांनी रसिकांना चिंब केले. या वेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, किरण साळी, कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन, सुनीता मोघे उपस्थित होत्या. 

फुटाणे म्हणाले, ""नेहमी व्यंग शोधत असतो. बाळासाहेब काव्यमैफलीत रमायचे. मुलाप्रमाणे ऐकायचे. आचार्य अत्रेंनी राजकारणात निर्भयता आणली, त्यामुळे भाष्यकविता लिहू लागलो.'' 

फुटाणे राज्य सरकारने नुकत्याच काढलेल्या सेल्फीच्या अध्यादेशाबाबत भाष्य करताना म्हणाले, ""मंत्र्याच्या बायकोने, मंत्र्याबरोबर बेडरूममध्ये सेल्फी क्‍लिक केला, 
सैल अंबाडा आणि पदर ठीक केला आणि हळूच पुटपुटली,  सांगाल तेव्हा काढणारच आहे, घरची हजेरी भरणार आहे.'' 

खरे म्हणाले, ""बाळासाहेबांची अंतिम यात्रा पाहिल्यानंतर ते कसे मातीत रुजलेले होते, त्यांची जनतेशी असलेली नाळ समजली.'' 

दुधाळ व धांडे यांनी आपल्या खास काव्य शैलीत शेतकरी आणि आदिवासींची व्यथा मांडली. खरे यांनी आपल्या नेहमीच्या अंदाजात श्रोत्यांच्या टाळ्या मिळविल्या, तर अनोख्या मराठी गझल पेश करीत मुळीक यांनी मैफलीत रंगत आणली. संतोष चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Ramdas phutane comment on the political stage