कॉंग्रेसच्या काही नेत्यांचा "हिशेब' बागवे मांडणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसच्या कोणत्या नेत्यांनी किती सहकार्य केले, याचा हिशेब मांडणारा वस्तुस्थिती दर्शक अहवाल प्रदेश कॉंग्रेसला पाठविणार असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी रविवारी सांगितले. 

पुणे - महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसच्या कोणत्या नेत्यांनी किती सहकार्य केले, याचा हिशेब मांडणारा वस्तुस्थिती दर्शक अहवाल प्रदेश कॉंग्रेसला पाठविणार असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी रविवारी सांगितले. 

महापालिका निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर पक्षांतर्गत वाद उफाळून आले आहेत. त्यातून पराभूत झालेल्या काही उमेदवारांनी स्थानिक पातळीवरील नेत्यांना लक्ष्य केले आहे. त्यांच्या नावाचा थेट उल्लेख करत नेत्यांबद्दलची गाऱ्हाणी थेट प्रदेश कॉंग्रेसला करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. या पार्श्‍वभूमीवर बागवे म्हणाले, ""निवडणूक ही सर्व नेत्यांची सामूहिक जबाबदारी होती. शहराध्यक्ष पदाच्या आठ महिन्यांच्या कारकिर्दीत महागाई, नोटाबंदी, मेट्रोचे उद्‌घाटनासह वेगवेगळी आंदोलने शहरात घेतली. तेव्हापासून ते आताच्या निवडणुकीपर्यंत कोणी, किती सहकार्य याची सविस्तर माहिती देणारा अहवाल पक्षश्रेष्ठींना देणार आहे. निवडणुकीत पक्षाशी बांधिलकी आवश्‍यक असते. ती कोणी किती दाखवली, आर्थिक मदत किती केली, याचाही स्पष्ट उल्लेख करणार आहे.'' 

पक्षाच्या आधारावर सत्ता मिळविली. त्यांनी पक्ष अडचणीत असताना केलेल्या सहकार्याचा तपशील या अहवालात देणार आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये नेत्यांनी पक्षाला किती ताकद दिली, याचाही आवर्जून उल्लेख करणार आल्याचे त्यांनी सांगितले. 

महापालिकेच्या या निवडणुकीत सामूहिक नेतृत्व होते. त्यातून वक्ता शिबिर, साप्ताहिक बैठका, ब्लॉक, मतदार संघ मेळावे आयोजित केले होते. याला नेत्यांकडून मिळालेला प्रतिसादही नमूद करणार आहे, असेही बागवे म्हणाले.

Web Title: ramesh bagwe Send reports to Congress