ओतूरमधील चोऱ्यांचे वाढते प्रमाण बघता रात्रीची गस्त वाढवणार - रमेश खुणे

junnar
junnar

ओतूर ता.जुन्नर -  वाढत्या चोऱ्यांच्या पर्श्वभूमीवर ओतूर पोलिस ठाण्यात आयोजित पोलिस पाटलांची व पोलिस मित्राची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये ग्राम सुरक्षादलात तरुणांचा जास्तित जास्त सहभाग वाढवून ग्राम सुरक्षादल सशक्त करणार असल्याचे, तसेच पोलिस पाटील, पोलिस मित्र व ग्रामसुरक्षा दल यांची रात्रीची गस्त वाढवणार असल्याची माहिती ओतूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक रमेश खुणे यांनी दिली.

खुणे पुढे म्हणाले, पोलिस ठाण्यातील ओतूर व परिसरातील गावांमध्ये संशयीत व्यक्ती किंवा गाडी अढळून आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावांमधील चौकांत, महामार्गवर तसेच महत्वाच्या ठिकाणी ग्रामपंचायत व नागरिकांच्या सहभागातून सी.सी.टी.व्ही बसवण्यासाठी आग्रही राहणार असुन, शाळा, महाविद्यालय व बसस्थानके आदी ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकाव्दारे टेहाळणी  करण्यात येणार आहे. महिला सुरक्षा कमीटीच्या सुचने नुसार महिला सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात उपाय योजना राबवणार आहे. तर रोड रोमीओ व महिलांची छेडछाड करणाराची गय केली जाणार नाही.

ओतूर शहरात व परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या व्यवसायिकावर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे व्यवसायिकानी व नागरिकांनी वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नाही म्हणुन पोलिसांकडुन दिलेल्या जाणाऱ्या सुचनांचे पालन करावे. तसेच पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन यावेळी रमेश खुणे यांनी केले.

यावेळी विविध गावातील पोलिस पाटील व ओतूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी व पोलिस मित्र उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com