बी गुड अॅंड डू गुड.. रामकृष्ण मठातर्फे पुण्यात दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

टीम ई सकाळ
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

विवेकानंदांच्या तत्वांना पुढे नेत व्यक्तिमत्व विकास साधणाऱ्या रामकृष्ण मिशनच्या पुण्यातील रामकृष्ण मठातर्फे या शनिवार व रविवार या दोन दिवसांच्या व्यक्तिमत्व विकास शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. अत्यंत नाममात्र श ुल्कामध्ये या शिबिराचा आस्वाद घेता येईल. सिस्टर निवेदिता यांच्या दिडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या यूथ कन्व्हेन्शनमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 16 व 17 सप्टेंबरला सकाळी 8 ते साडेपाच या वेळेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 17 ेत 32 वयोगटातील कुणीही या शिबिरात भाग घेऊ शकतो.

पुणे :  विवेकानंदांच्या तत्वांना पुढे नेत व्यक्तिमत्व विकास साधणाऱ्या रामकृष्ण मिशनच्या पुण्यातील रामकृष्ण मठातर्फे या शनिवार व रविवार या दोन दिवसांच्या व्यक्तिमत्व विकास शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. अत्यंत नाममात्र श ुल्कामध्ये या शिबिराचा आस्वाद घेता येईल. सिस्टर निवेदिता यांच्या दिडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या यूथ कन्व्हेन्शनमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 16 व 17 सप्टेंबरला सकाळी 8 ते साडेपाच या वेळेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 17 ेत 32 वयोगटातील कुणीही या शिबिरात भाग घेऊ शकतो. 

या दोन दिवसांत पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, स्वामी अभिरामानंद, स्वामी शुद्धीदानंद, स्वामी नरसिंहानंद, डाॅ. जगन राव, स्वामी श्रीकांतनंद यांसह पुण्याच्या आयुक्त रश्मी शुक्ला, गायक कस्तुरी व गंधार देशपांडे, स्वामी बुद्धानंद आदींची व्याख्यानं होणार आहेत. यात डिव्होशनल म्य़ुजिक कसं एेकावं, आत्मविश्वास कसा वाढवावा, व्यक्तिमत्व विकास कसा साधावा, किर्तन आदीं विषयांचा अंतर्भाव असेल. अत्यंत सोप्या शब्दात विवेकानंदांची तत्वप्रणाली आणि त्यातून साधायचा विकास याची सांगड घातली जाणार आहे. या दोन दिवसांच्या कार्यशाळेची फी केवळ 100 रूपये असून प्रवेश मर्यादित असणार आहेत. अशी माहिती या शिबिराचे समन्वयक व मठाचे स्वयंसेवक हेमंत चव्हाण यांनी दिली. 

हे शिबिर पुण्यातील दांडेकर पुलाजवळच्या रामकृष्ण मठामध्ये होणार आहे. अधिक माहितीसाठी 020- 24325132, 24333727, 24320453 या नंबरवर संपर्क साधता येईल.  

Web Title: Ramkrishna math workshop charector building esakal news