तायक्वांदो स्पर्धेत रामकृष्ण मोरे इंग्लिश मिडीयमच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

दत्ता म्हसकर
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

जुन्नर - आळेफाटा ता.जुन्नर येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत निवृत्तीनगर (धालेवाडी) येथील स्व.प्रा.रामकृष्ण मोरे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्ध्यांनी सर्वच गटात सुवर्णमय कामगिरी केली असून या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.  

शाळेतील विद्यार्थी अदित्य थोरवे, वेदांत डुंबरे, यश पाटोळे, अवधूत पवार, आर्यन भोर, व सृष्टी शेळके यांनी सुवर्ण पदक तर मीत शिंदे, विनीत आहेर, श्रावील लांडगे, प्रज्वल नेहरकर, गायत्री देवने, समीक्षा ढोमसे यांनी सिल्व्हर व तेजस यादव, प्रतीक मोरे, प्रसाद कुटे, साहिल काशीद, ऋषिकेश मोरे, निखिल यादव, शुभम नलावडे, साहिल बोराडे, जयेश म्हस्करे, आदित्य जगदाळे, प्रज्वल बट्वाल, सुजल नलावडे, आदेश नेहरकर, हर्षल नायकोडी, स्नेहा यंदे, ईश्वरी नलावडे, शिवानी सिंग, आकांक्षा भोर , श्रद्धा थोरवे यांनी ब्राझ पदके मिळविली. मेहनत व जिद्दीच्या जोरावर हे दैदिप्यमान यश संपादन करताना विद्यार्थ्यांना शाळेतील क्रीडा शिक्षक व प्राचार्य यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. 

तालुका स्तरीय तायक्वांदो स्पर्धेत शाळेने मिळविलेल्या अतुलनिय यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून संस्थेचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, सचिव राजेंद्र जंगले, कारखान्याचे सचिव अरुण थोरवे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

Web Title: Ramkrishna More in the Taekwondo Competition