पुण्यात पाण्याचे हांडे घेऊन चढावा लागतो डोंगर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

पुणे: रामनगर परिसरात डोंगरावर पाणी येत नसल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांना पाणी आणण्यासाठी मुख्य चौकात यावे लागते. यासाठी डोंगरावर टाकी बांधून पाणी द्यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी 'सकाळ'शी बोलताना केली. 

या संदर्भात येथील नागरिक समीर कुडले आणि त्यांचे सहकारी सागर मिसाळ, शिवा गायकवाड, शुभम तांदळे, शेखर महाडिक यांनी या भागांत पाणी मिळावे, म्हणून पाणीपुरवठा विभागाकडे पत्रव्यवहार केले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी पाणी विभागाचे शेंडे, कदम यांनी रामनगरला भेट दिली. 

डोंगरवाडी, मधला पट्टा या भागात चार घरांजवळ एक कोंढाळी करावी. त्यासाठी डोंगरावर टाकी बांधून उतारावरील भागाला टप्प्याटप्याने पाणी द्यावे, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे. 

डोंगरवाडी, मधला पट्टा, गोसावी वस्ती या भागातील नागरिक डोंगरावर राहतात. त्यांना पाणी आणण्यासाठी सुदर्शन चौक, हनुमान चौक, अचानक चौक या भागात यावे लागते. या भागात सुमारे 2500 लोकसंख्या आहे. येथे पाणी येण्याची वेळ दुपारी 2 ते 3 वाजताची आहे. महिला मुलांना सध्या भरउन्हात पाण्याचे हांडे डोक्‍यावर घेऊन 200 ते 250 मीटर चढत जावे लागते. 

रामनगर परिसरात पाण्याच्या दोन टाक्‍या आहेत. त्यातील एक उंच टाकी आहे. त्याची देखील दुरुस्ती नुकतीच केली आहे. एक जुनी बैठी टाकी आहे. त्या जागी नवीन उंच टाकी बांधण्याचे नियोजन आहे. जूनमध्ये त्याचे काम सुरू होईल, असे नगरसेवक दिलीप बराटे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

पाण्यासाठी महिलांची झुंबड 
नळ कोंढल्यावर स्वप्नाली मोहोळ, आशा दिघे, सुवर्णा कुल, संगीता चव्हाण, सुमन रायरीकर, विद्या पवार या पाणी भरत होत्या. त्या म्हणाल्या, 'सहा सात नळ कोंढल्यावर 500 ते 600 घरातील महिलांची गर्दी होते. त्या सर्वांना एका तासात या घरातील सर्व प्रकारचे पाणी भरायचे असते. महिला पाणी भरणार म्हटले की वाद होतात. पाण्याची वेळ कमी असल्याने मुलांचीदेखील पाणी भरण्यासाठी मदत घ्यावी लागते.'
 
Web Title: Ramnagar Residents in Pune facing water supply issue