‘रानभूल’ महोत्सव आजपासून सुरू

Ranbhul
Ranbhul

पुणे - ‘रानभूल’ वन्यजीव महोत्सव येत्या शुक्रवारपासून (ता. ८) घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू प्रेक्षागृहात सुरू होत आहे. रविवारपर्यंत (ता. १०) रंगणाऱ्या या महोत्सवात अनेक चित्रपट आणि माहितीपट पाहण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. या महोत्सवाचे उद्‌घाटन वन्यजीव चित्रपटकार नल्ला मुत्थू यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ८) सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी होणार आहे. या वेळी ‘एन्व्हायर्न्मेंट फोरम ऑफ इंडिया’च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, पुणे विभागाचे (वन्यजीव) वनसंरक्षक रवी वानखेडे उपस्थित राहणार आहेत.

आवर्जून पाहावे असे माहितीपट...
  ८ मार्च, सायंकाळी ६.१५ वाजता. स्थळ - पंडित जवाहरलाल नेहरू प्रेक्षागृह, घोले रस्ता

  टायगर्स रिव्हेंज - नल्ला मुत्थू निर्मित ‘टायगर्स रिव्हेंज’ हा माहितीपट आहे. मातृत्वाची प्रबळ इच्छा असणारी वाघीण त्यासाठी कोणते विस्मयकारक निर्णय घेऊ शकते, याचे चित्रण या माहितीपटात आहे. रणथंबोर येथील व्याघ्र प्रकल्पातील एका वाघिणीवर आधारित या माहितीपटात तिला इच्छापूर्तीसाठी काय करावे लागले, यासाठी कोणती किंमत मोजावी लागली यावर यात प्रकाश टाकला आहे. या माहितीपटाच्या सादरीकरणानंतर नल्ला यांच्याशी संवाद साधता येईल. 

  ९ मार्च, सायंकाळी ५ वाजता. स्थळ - पंडित जवाहरलाल नेहरू प्रेक्षागृह, 
घोले रस्ता

  द फरगॉटन टायगर्स - कृष्णेंदू बोस यांनी निर्मिती केलेला हा माहितीपट आहे. देशातील व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यातील वाघांबद्दल कायमच बोलले जाते. परंतु अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्पांच्या बाहेरही वाघ आहेत. गावांलगतच्या जंगलांमधून ते तग धरून आहेत. या वाघांवर, त्यांच्या जीवनावर, त्यांच्यासमोरील समस्यांवर प्रकाश टाकणारा हा माहितीपट आहे. दोन अभयारण्यांना अथवा व्याघ्र प्रकल्पांना जोडणाऱ्या कॉरिडॉरचे महत्त्व यातून अधिक ठळक होते.

व्हेन कॅमेरा स्पीक्‍स 
थॉमस हे त्यांची छायाचित्रे सादर करणार आहेत. आवड आणि छंद जोपसण्याबरोबर निसर्गसंवर्धनही करू शकतो याचे थॉमस हे उदाहरण आहेत. हे काम करताना त्यांना आलेले अनुभव या निमित्ताने ते सांगणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com