बारामतीत सादर झाली शब्दसुरांची रांगोळी.

कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य
शब्दसुरांची रांगोळी या कार्यक्रमात सहभागी महिला भगिनी.
शब्दसुरांची रांगोळी या कार्यक्रमात सहभागी महिला भगिनी.sakal

बारामती: कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत भगिनी मंडळाच्या वतीने शब्दसुरांची रांगोळी हा विविधरंगी कार्यक्रम नुकताच सादर केला गेला. सर्व स्थानिक कलाकारांनी मेलडी, संगीत, ओव्या, कविता, नृत्य व गीत गायन यांचा संगम करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पौर्णिमा तावरे, किरण गुजर, वर्षा सिधये,सुचित्रा गांधले, सपना ननवरे, राजेंद्र सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला.

भगिनी मंडळाच्या अध्यक्षा दीपा महाडीक व मुख्य विश्वस्त सुनिता शहा यांनी स्वागत करुन आभार मानले. या प्रसंगी अँग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार, शरयू फाऊंडेशनच्या विश्वस्त शर्मिला पवार, माजी नगराध्यक्षा जयश्री सातव, मंगल सराफ, भारती मुथा उपस्थित होत्या. या मध्ये आश्लेषा मुंगी यांनी पात्र परिचय करुन दिला, संकल्पना रेखा करंदीकर यांची होती, निवेदन रेखा करंदीकर व डॉ. सुहासिनी सातव यांनी केले. संगीत संयोजन व वादन सुहास व गंधार अष्टपुत्रे यांनी केले तबल्यावर गुलाबराव आटोळे यांनी साध दिली, वैशाली काकडे, किशोरी सातव व मनिषा जाधव यांनी गीत गायन केले. प्रदयुम्न क्षीरसागर यांनी पार्श्वसंगीत दिले, अनिता खरात यांनी ध्वनी संयोजन केले. दीप्ती कदम, बिजल दोशी, विशाखा मयेकर, गौरी गांधले, नेहा कोठारी यांनी नृत्य दिग्दर्शन केले. संगीत रुसली रुक्मिण हे सादरीकरण हर्षदा सस्ते व मधुरा करंदीकर यांनी साकारले.

दीप्ती कदम, बीजल दोशी, हिंदवी कुलकर्णी, अपर्णा राठी, नेत्रा सिकची, निधी मोता, विशाखा मयेकर, नेहा कोठारी, दर्शना जेधे, गौरी गांधले व नेहा पाध्ये यांनी नृत्य सादरीकरण केले. वारकरी भजन या प्रकारात मंगल बोरावके, हर्षदा सस्ते, योजना देवळे, मृदूल देशपांडे, रुमा कोठडीया, लता ओसवाल, जयश्री राजेंद्र, लीना बालगुडे, स्नेहा मेनसे, मेघना गुगळे, पूनम पवार, सीमा चव्हाण, पल्लवी भुते, सीमा सोनवणे, शारदा बेलपत्रे, शीला देव, अर्चना शहा, शुभांगी जामदार, सुवर्णा मोरे, निकीता खटावकर यांनी सहभाग घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com