पराक्रमी ताराबाईंचा इतिहास दुर्लक्षित - डॉ. जयसिंगराव पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

पुणे - 'आपण इतिहासाकडे एका विशिष्ट चष्म्यातूनच पाहतो. त्यामुळे सगळा इतिहास अजून समोर आलेला नाही. शिवाजी महाराजांच्या पश्‍चात औरंगजेबाबरोबर ज्या स्त्रीने सात वर्षे लष्करी संघर्ष केला, त्या ताराबाईंनादेखील आपण उपेक्षित ठेवले. असा पराक्रम जगाच्या इतिहासात अन्य कोणत्याही स्त्रीने केलेला नाही. त्यामुळे प्रत्येक शहरात, गावात शिवाजी महाराजांनंतर ताराबाईंचा पुतळा उभा राहिला पाहिजे. शेवटी नानासाहेब पेशवे यांच्याशी केलेल्या संघर्षामुळे ताराबाईंना सत्तापिपासू ठरविले गेले; पण यामुळे त्यांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,’’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहास संशोधक डॉ.

पुणे - 'आपण इतिहासाकडे एका विशिष्ट चष्म्यातूनच पाहतो. त्यामुळे सगळा इतिहास अजून समोर आलेला नाही. शिवाजी महाराजांच्या पश्‍चात औरंगजेबाबरोबर ज्या स्त्रीने सात वर्षे लष्करी संघर्ष केला, त्या ताराबाईंनादेखील आपण उपेक्षित ठेवले. असा पराक्रम जगाच्या इतिहासात अन्य कोणत्याही स्त्रीने केलेला नाही. त्यामुळे प्रत्येक शहरात, गावात शिवाजी महाराजांनंतर ताराबाईंचा पुतळा उभा राहिला पाहिजे. शेवटी नानासाहेब पेशवे यांच्याशी केलेल्या संघर्षामुळे ताराबाईंना सत्तापिपासू ठरविले गेले; पण यामुळे त्यांच्या कर्तृत्वाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,’’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केले. 

डॉ. पवार यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा वाङ्‌मयीन क्षेत्रासाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल  यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित साहित्यिक कलावंत संमेलनात त्यांचा सन्मान साहित्यिक संमेलनाचे संयोजक दिलीप बराटे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी डॉ. गणेश राऊत यांनी डॉ. पवार यांच्याशी प्रकट मुलाखतीद्वारे संवाद साधला.  

डॉ. पवार म्हणाले, ‘‘मानवी जीवनाच्या वाटचालीचा वृत्तांत म्हणजे इतिहास. कोणत्याही विषयाच्या चौकटीत इतिहास़़़ या विषयाला बसवता येणार नाही. इतिहास म्हणजे केवळ लढाई, युद्ध आणि राजकारण नाही. फुकाचा अभिमान बाळगायचा आणि चुकीचा इतिहास लोकांसमोर ठेवायचा, हे चुकीचे आहे. इतिहासाच्या पोटात अनेक संदर्भ असतात, संशोधक या नात्याने ते संदर्भ प्रकाशात आणणे हे आपले कर्तव्य असते.’’

Web Title: Rani Tarabai History Ignored Jaysingrao Pawar