रांजणगावात १० वर्षानंतर सत्ता परिवर्तन

रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील ग्रांमपंचायतीच्या निवडणुकीत विजयी सरपंच सर्जेराव खेडकर यांची कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणुक काढून विजयोत्सव साजरा केला.
रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील ग्रांमपंचायतीच्या निवडणुकीत विजयी सरपंच सर्जेराव खेडकर यांची कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणुक काढून विजयोत्सव साजरा केला.

तळेगाव ढमढेरे (पुणे): रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथील गेली १० वर्षाची ग्रांमपंचायतीची सत्ता मतदारांनी उलथून टाकली असून, ग्रांमपंचायतीमध्ये श्री मंगलमूर्ती पॅनेलने १७ पैकी १६ जागा जिंकून सत्ताधारी महागणपती पॅनेलचा धुव्वा उडवून सरपंचासह ग्रांमपंचायतीत निर्विवाद स्पष्ट बहुमत मिळवून परिवर्तन केले आहे.

येथील ग्रांमपंचायतीच्या निवडणुकीत श्री मंगलमूर्ती पॅनेलचे उमेदवार सर्जेराव बबन खेडकर यांनी महागणपती पॅनेलचे उमेदवार दत्तात्रय आनंदराव पाचुंदकर यांचा पराभव करून सरपंचपदी विराजमान होण्याचा मान मिळविला आहे. सहा प्रभागात १७ जागांसाठी झालेल्या सदस्यांच्या निडणुकीत सत्ताधारी महागणपती पॅनेलला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. ग्रांमपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत दोन्ही पॅनेलमध्ये चुरशीची निवडणूक झाली.५५८६ मतदानापैकी ४८९२ इतके एकूण मतदान झाले.सरपंचपदासाठी सर्जेराव खेडकर यांना २४४१ मते आणि दत्तात्रय पाचुंदकर यांना २४२५ मते मिळाली.१७ मतांनी श्री खेडकर विजयी झाले आहेत.

प्रभागानुसार विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :-
प्रभाग एक : हिराबाई पंढरीनाथ खेडकर व आनंदा तुकाराम खेडकर.
प्रभाग दोन : विलास बाळासाो अडसूळ,अजय तुकाराम गलांडे व निलम श्रीकांत पाचुंदकर.
प्रभाग तीन :  धनंजय विठ्ठल पवार, सुजाता पंडीत लांडे व सरेखा प्रकाश लांडे
प्रभाग चार : स्वाती भानुदास शेळके, बाबासो धोंडिबा लांडे व सुप्रीया योगेश लांडे.
प्रभाग क्रमांक पाच : रंभा माणिक फंड, राहूल अनिल पवार व अनिता सुदाम कुटे .
प्रभाग क्रमांक साहा :  संपत गणपत खेडकर,आकाश संजय बत्ते व अर्चना संदिप पाचुंदकर.

दरम्यान, रांजणगाव गणपती येथील जिल्हा परिषदेच्या सदस्या स्वाती पाचुंदकर यांचे पती दत्तात्रेय पाचुंदकर यांना सरपंचपदावर पराभव स्वीकारावा लागला आहे. तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य
शेखर पाचुंदकर यांची मातोश्री लक्ष्मीबाई पाचुंदकर यांनाही या निवडणुकीत सदस्य पदासाठी हार पत्करावी लागली आहे. जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्या पॅनेलला
मोठी हार पत्करावी लागली यामध्ये फक्त अर्चना पाचुंदकर यांना विजय मिळाला आहे. येथील सरपंचपदाची जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) असल्याने कुणबी फॅक्टरला मतदारांनी साफ  नाकारल्याची चर्चा आहे. तसेच गेली १० वर्षे सत्ता उपभोगलेल्या सत्ताधाऱयांनी गावाचा विकास केलेला मतदारांना महत्वाचा वाटला नसून परिवर्तन करण्याच्या उद्देशाने सत्ताधाऱयांना धक्का दिला आहे.

येथील ग्रांमपंचायत निवडणुकीत दोन्ही पॅनेलकडून मोठी आर्थिक उलाढाल झाली असली तरी सत्ताधाऱयांच्या विरोधी अनपेक्षित लाट निर्माण करून विरोधी पॅनेलने निर्विवाद सत्ता खेचून आणली आहे. मंगलमूर्ती पॅनेलचे नेतृत्व पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रभाकर पाचुंदकर, माजी आदर्श सरपंच भिमाजीराव खेडकर,माजी जिल्हा परिषद सदस्या कविता खेडकर आदींनी केले. निवडणुकीनंतर श्री. खेडकर यांच्या कार्यकर्त्यांनी व विजयी सदस्यांनी अष्टविनायक महागणपती मंदिरात महागणपतीचे दर्शन घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com