ग्रामस्थांना विश्वासात घेऊन विकास करा: जयंतराव पाटील

नागनाथ शिंगाडे
गुरुवार, 3 जानेवारी 2019

तळेगाव ढमढेरेः "सरपंच हा गावच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. सरकारच्या विविध योजनांची माहिती घेऊन निधीचा वापर लोककल्याणासाठी करावा, सर्व सदस्य व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन विकासाचे नियोजन करा,'' असे आवाहन महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केले.

तळेगाव ढमढेरेः "सरपंच हा गावच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. सरकारच्या विविध योजनांची माहिती घेऊन निधीचा वापर लोककल्याणासाठी करावा, सर्व सदस्य व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन विकासाचे नियोजन करा,'' असे आवाहन महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केले.

रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे बुधवारी आयोजित केलेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याच्या सत्कार समारंभात पाटील बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत मोरे होते. यावेळी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत 10 वर्षानंतर सत्तांतर घडवून पहिल्यांदाच जनतेतून निवडून आलेले सरपंच सर्जेराव खेडकर, नवनिर्वाचित उपसरपंच राहुल पवार व ग्रामपंचायत सदस्यांची बाजारपेठेतून अष्टविनायक महागणपती मंदिरापर्यंत सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. येथील महागणपती मंदिरात नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार जयंतराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

पंचायत समितीचे माजी उपसभापती आबासाहेब पाचुंदकर, माजी सरपंच भीमाजीराव खेडकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या कविता खेडकर, खरेदी विक्री संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र नरवडे, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, प्रा. माणिकराव खेडकर, सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष अशोक गायकवाड, उद्योजक राजेश लांडे, युवा नेते श्रीकांत पाचुंदकर, रघुनाथ फंड, बापूसाहेब शिंदे, अनिल शेळके, महेश फंड, मोहन चिखले, राहुल शेळके, भानुदास शेळके, रोहिदास खेडकर, नितीन लांडे, रवींद्र कुदळे, संदीप कुटे, ऍड. विकास कुटे, प्रकाश लांडे, प्रताप फंड, नामदेव पाचुंदकर उपस्थित होते.

Web Title: ranjangaon ganpati gram panchayat member and jayantrao patil