esakal | रांजणगाव गणपती मंदिरात गणेश जयंती साधेपणाने साजरी

बोलून बातमी शोधा

रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे गणेश जयंतीनिमित्त अष्टविनायक महागणपतीला आकर्षक पोशाख, सुवर्ण अलंकार व फुलांची आरास करण्यात आली होती.}

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे 'श्री गणेश जयंती' साधेपणाने साजरी करण्यात आली. त्यानिमित्त अष्टविनायक महागणपती मंदिरात प्रगतशील शेतकरी नानासाहेब पाचुंदकर पाटील यांच्यातर्फे आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.​

pune
रांजणगाव गणपती मंदिरात गणेश जयंती साधेपणाने साजरी
sakal_logo
By
नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे - श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे 'श्री गणेश जयंती' साधेपणाने साजरी करण्यात आली. त्यानिमित्त अष्टविनायक महागणपती मंदिरात प्रगतशील शेतकरी नानासाहेब पाचुंदकर पाटील यांच्यातर्फे आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

श्री  क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे महागणपतीची पाहाटे अभिषेक व पूजा करण्यात आली. त्यानंतर गणेश जयंती निमित्त गणेश याग करण्यात आला. देवस्थानच्यावतीने श्रींचे समोर दुपारी व सायंकाळी सहस्रावर्तने , महापुजा व महानैवेद्य करण्यात आला. यावेळी महागणपतीला आकर्षक सुवर्णालंकार व आकर्षक पोशाख परिधान करण्यात आला होता. रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बारामती : कुंपनानंच शेत खाल्लं! ATMमध्ये भरण्यासाठी दिलेले ३ कोटी केले लंपास

यावेळी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉ.संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, अँड. विजयराज दरेकर, शेखर देव , व्यवस्थापक  बाळासाहेब गोऱ्हे, संतोष रणपिसे तसेच पुजारी मकरंद कुलकर्णी व प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे गणेश जन्म सोहळा आणि द्वारयात्रा साधेपणाने व मर्यादित लोकांच्या उपस्थितीत  साजरा करण्यात आला.

Edited By - Prashant Patil