शिवसेनेकडून वातावरण प्रदूषित - दानवे

मंगेश कोळपकर
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

काकडे-बापट यांची जुगलबंदी
भाषणात काकडे आणि बापट यांची जुगलबंदी झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी खासदार आणि 8 आमदार निवडून आणले, असे काकडे म्हणाले. तर, भाजप हा सोम्या-गोम्यांचा पक्ष नाही, विचार आणि कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, असे प्रत्युत्तर बापट यांनी काकडे यांना दिले.

पुणे - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती झाली नाही, तरी परस्परांमधील कटुता टाळायची, असे पूर्वी ठरले होते. मात्र आरोप- प्रत्यारोप करून शिवसेना वातावरण प्रदूषित करीत आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज येथे महापालिका निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फोडताना केला.

भाजपच्या 162 उमेदवारांना सिंहगडावर पुणे दरवाजात सुशासन आणि पारदर्शक प्रशासनाची शपथ दानवे यांनी सोमवारी दिली. तेव्हा ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, शहराध्यक्ष योगेश गोगावले आदी या प्रसंगी उपस्थित होते.

सिंहगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन भाजप महापालिकेच्या माध्यमातून सुराज्याची मुहूर्तमेढ रोवणार असल्याचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी यापूर्वीच सांगितले होते. पारदर्शक, गतिमान, भ्रष्टाचारमुक्त, विकासाभिमुख, सुशासनासाठी कटिबद्ध होण्याची शपथ याठिकाणी घेण्यात आली.

काकडे-बापट यांची जुगलबंदी
भाषणात काकडे आणि बापट यांची जुगलबंदी झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी खासदार आणि 8 आमदार निवडून आणले, असे काकडे म्हणाले. तर, भाजप हा सोम्या-गोम्यांचा पक्ष नाही, विचार आणि कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, असे प्रत्युत्तर बापट यांनी काकडे यांना दिले.

Web Title: Raosaheb Danve criticize Shivsena