मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्याला १५ वर्षे सक्तमजुरी

Court
Court

पुणे - पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला १५ वर्षे सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांनी हा निकाल दिला. 

पीडित आठवीत असल्यापासून मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य वडील करीत होते. तसेच तिच्याबरोबर वेळोवेळी शरीर संबंध ठेवले. त्यातून दहावीत असताना ती दोन महिन्यांची गरोदर राहिली. गर्भपाताच्या गोळ्या देऊन त्याने तिचा गर्भपात केला. याबाबत आई, भावाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही दिली होती.   

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईनगर भागात २५ एप्रिल २०१६ आणि त्यापूर्वी सात वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. फिर्यादीच्या वेळी पीडितेचे वय १९ होते, तर वडील ४६ वर्षांचे होते. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे वकील सुरेश गवळी यांनी काम पाहिले. त्यांनी ११ साक्षीदार तपासले. त्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्या लता सोनवणे, पीडितेची मैत्रीण यांची साक्ष आणि वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com