पुण्यात अवघ्या अडीच वर्षाच्या मुलीवर बलात्कार, मुलीचा मृत्यू

पुण्यात अवघ्या अडीच वर्षाच्या मुलीवर बलात्कार, मुलीचा मृत्यू

पुणे ः पदपथावरील पालामध्ये आई-वडिलांसमवेत झोपलेल्या अडीच वर्षांच्या मुलीला अनोळखी व्यक्तीने उचलून नेले व तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुलीवर विकृत कृत्य करून अंगावर जखमा केल्या. दरम्यान, बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या मुलीस पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरात घडली. 

पुणे स्टेशन परिसरात 40 ते 50 भटक्‍या व विमुक्त समाजातील कुटुंबे पालामध्ये वास्तव्य करतात. लिंबू, मिरची, खेळणी विकून उदरनिर्वाह करतात. त्यामध्ये काहीजण भिक्षेकरी आहेत. भटक्‍या व विमुक्त प्रवर्गातील दांपत्य उदरनिर्वाहासाठी पुणे स्टेशन येथे आले होते. संबंधित दांपत्य मजुरी करते. त्यांच्या अडीच वर्षांच्या मुलीसमवेत ते पालामध्ये वास्तव्य करीत आहे. दरम्यान, मंगळवारी पहाटे पाच वाजता अनोळखी व्यक्तीने मुलीला उचलून नेले. आईला जाग आल्यानंतर शोध घेण्यास सुरवात केली. 

दरम्यान, सकाळी सात वाजता पुणे रेल्वे स्थानक परिसरात गस्त घालणाऱ्या लोहमार्ग पोलिसांना रेल्वेच्या डब्यामध्ये मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करून तिच्या पालकांचा शोध घेतला. चौकशी करताना आई-वडिलांनी मुलीचे छायाचित्र ओळखले. मुलीवर उपचार सुरू असताना सायंकाळी साडेपाच वाजता मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. दरम्यान, आरोपी कोण आहे, या घटनेत किती जणांचा सहभाग आहे, याचा तपास बंडगार्डन पोलिस करीत आहेत. 

अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून झाल्याची घटना घडल्यानंतर बारा तास उलटून गेल्यानंतरही मुलीची बेवारस म्हणून नोंद केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेण्याकडे दुर्लक्ष केले. - राजश्री काळे, नगरसेविका व सामाजिक कार्यकर्त्या 

अडीच वर्षांची मुलगी जखमी अवस्थेत आढळली. तिला उपचारांसाठी ससूनमध्ये दाखल केले. उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाला सुरवात केली आहे. - शिरीष सरदेशपांडे, पोलिस उपायुक्‍त, परिमंडळ दोन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com