दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार

Rape
Rape

पुणे - शहराच्या वेगवेगळ्या भागांत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. एका घटनेत फेसबुकवरील ओळखीतून संपर्क वाढवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाले, तर दुसऱ्या घटनेत धमकावून मुलीवर अत्याचार झाला. याप्रकरणी बिबवेवाडी व वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फेसबुकवरून ओळख वाढवून मुलीवर बलात्कार करणाऱ्या गौरव चंदरकर (रा. जळगाव) याच्याविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांनी बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी व चंदरकरची फेसबुकवर ओळख झाली होती. त्यानंतर दोघे संपर्कात आले.

चंदरकरने मुलीला विवाह करण्याचे आमिष दाखविले. दहा दिवसांपूर्वी त्याने मुलीला रास्ता पेठ भागातील एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. मोबाईलवर छायाचित्र काढत तिला धमकाविले. दुसऱ्या घटनेत वानवडीतील सय्यदनगरमधील एका अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर बलात्काराची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यावरून सिकंदर शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेखने मुलीला धमकावून तिच्यावर अनेकदा अत्याचार केले. या घटनेनंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com