उंड्री-पिसोळीमध्ये दोघांचा तरुणीवर बलात्कार

Rape on woman in undri pune
Rape on woman in undri pune

पुणे : एकमेकांशी ओळख असलेल्या दोघांनी आपल्यासमवेतच्या तरुणीला मित्रास त्रास होत असल्याचे सांगून रात्रीच्या वेळी निर्जन परिसरात तरुणीवर दोघांनी नेऊन बलात्कार केला. ही घटना शनिवारी रात्री उंड्री-पिसोळी परिसरात घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी हडपसरमधील माळवाडी परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन कृष्णा बबन जाधव, अक्षय चव्हाण (दोघेही रा. गोंधळेनगर, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा, अक्षय व तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. शनिवारी अक्षय व कृष्णा तरुणीकडे आले. अक्षयने कृष्णाला उलट्यांचा त्रास होत असून त्यास उपचारांसाठी घेऊन जायचे आहे, असे तरुणीस सांगितले. त्यानंतर दोघांनी तरुणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून तिघेजण ट्रिपल सीट पिसोळी येथील ब्रम्हकुमारी विद्यापीठाजवळील डोंगरामध्ये गेले. त्यानंतर दोघांनी तरुणीस जबरदस्तीने दारु पाजली. त्यानंतर दोघांनी तरुणीला मारहाण करुन तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, या घटनेमुळे तरुणी घाबरली होती. त्यानंतरही तिने पोलिसांकडे धाव घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. कोंढवा पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com