esakal | निगडीत तरुणीवर सामूहिक बलात्कार 
sakal

बोलून बातमी शोधा

rape on young girl in nigdi

निगडीत तरुणीवर सामूहिक बलात्कार 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : तरुणीच्या तोंडावर गुंगीचे औषध फवारून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना निगडी येथे उघडकीस आली.

याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला. शुक्रवारी (ता. 30) सकाळी सातच्या सुमारास पीडित तरुणी निगडीतील टिळक चौकातून पायी जात होती. त्या वेळी रिक्षातून आलेल्या आरोपींनी गुंगीचे औषध असलेला स्प्रे तरुणीच्या तोंडावर फवारला. त्यानंतर तोंडाला रुमाल लावून रिक्षातून तिला अज्ञातस्थळी नेत तिघांनी तरुणीवर अत्याचार केला. 


 

loading image
go to top