इंटर्नशिपचे आमिष दाखवून पिंपरीत तरुणीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

पिंपरी : इंटर्नशिपसाठी कंपनीत प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाने तरुणीवर बलात्कार केला. तसेच, तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी देत तिला मारहाण केली. 

पिंपरी : इंटर्नशिपसाठी कंपनीत प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाने तरुणीवर बलात्कार केला. तसेच, तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी देत तिला मारहाण केली. 

तुषार कासार (वय 21, रा. वाळकी, जि. अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी व तरुणीची फेसबुकवर ओळख झाली. त्यानंतर त्याने तिला चाकण येथील नामांकित कंपनीत इंटर्नशीपसाठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविले व तिच्याशी जवळीक निर्माण केली. दरम्यान, तिचा पाठलाग करून, तसेच तिच्या भावाला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतरही तो संबंधित तरुणीच्या घरी जाऊन भांडणे करू लागला. भांडणाला कंटाळून ती रामटेकडी येथील लोहिया उद्यानात गेली असता, तेथे तिला शिवीगाळ करत मारहाण केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rape on young girl in pimpri