esakal | शीतपेयातुन गुंगीचे औषध देत तरुणीवर बलात्कार | Pune
sakal

बोलून बातमी शोधा

crime

शीतपेयातुन गुंगीचे औषध देत तरुणीवर बलात्कार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : उत्पादनाबाबत ग्राहकाला माहिती देण्याचा बहाणा करून तरुणीला लॉजमध्ये नेऊन एकाने तिला शीतपेयातुन गुंगीचे औषध देत तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. तसेच या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण समाजमाध्यमात प्रसारीत करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार केला. अखेर या प्रकाराला कंटाळून तरुणीने त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी 25 वर्षीय तरुणीने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी हि एका कंपनीच्या उत्पादनांबाबत माहिती देण्याचे काम करते. त्यातुनच आरोपीची तिच्यासमवेत ओळख झाली होती. दरम्यान, आरोपीने तरुणीला एका ग्राहकाची ओळख करून देतो, असा बहाणा करून पुणे स्टेशन परिसरातील लॉजवर नेले. तेथे तरुणीला शीतपेयातुन गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला.

त्याने या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरणही करून तरुणीला "तू माझ्याशी संबंध ठेव, अन्यथा व्हिडीओ चित्रीकरण व छायाचित्र तिच्या पतीला पाठवेल, तुझी बदनामी करेल' अशी धमकी दिली. दरम्यान, आरोपीकडून तरुणीवर सातत्याने अत्याचार सुरू राहील्याने तरुणीने हा प्रकार तिच्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस तपास करीत आहेत.

loading image
go to top