पुण्यातील 'या' भागात होणार रॅपिड स्वॅब टेस्टींग सेंटर

swab center.jpg
swab center.jpg

धनकवडी (पुणे) : स्वॅब टेस्टिंग कलेक्शन सेंटरसाठी महापालिकेच्या माध्यमातून नगरसेवक विशाल तांबे यांच्यातर्फे प्रभाग ३९ धनकवडी आंबेगाव पठर मधील शरदचंद्रजी पवार बहुउद्देशीय भवन येथे कोविड रॅपिड टेस्टिंग कलेक्शन सेंटर सुरू होणार आहे. धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत ४ प्रभाग व नवीन समाविष्ट गावे यांच्यासाठी सेवा उपलब्ध आहे. या प्रभातील ६ लाख नागरिकांसाठी सोयीचे होणार आहे. रोज ५०० लोकांची कोविड चाचणी करण्याची व्यवस्था या ठिकाणी केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तांबे यांनी केवळ दोन दिवसांपूर्वी क्षेत्रिय कार्यालय सहा-आयुक्त निलेश देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या नागमोडे, डीएसआय राजू दुल्लम, धनराज नवले व आरोग्य कर्मचारी यांच्याशी चर्चा करून नियोजनबद्ध पाहणी करून बैठक व्यवस्था व स्वॅब टेस्टिंग कलेक्शनचे नियोजन केले. पुढील दोन दिवसात कोविड रॅपिड टेस्टिंग कलेक्शन सेंटर सुरू होणार आहे.

याबाबत  तांबे म्हणाले, आरोग्य सेवेवर भार खूप आहे, पण आपल्या भागातील नागरिकांसाठी सर्व उपाययोजना करण्यासाठी धनकवडीमध्ये नवीन स्वॅब सेंटर व्हावे जेणेकरून नागरिकांची धावपळ होणार नाही व रुग्ण निदान लवकर होऊन पुढील उपचार वेळेत मिळतील आणि धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत 28 कन्टेंन्मेंट झोन असून स्वतंत्र स्वॅब सेंटर असावे यासाठी सोमवारी (13) महापालिका आयुक्त यांच्याकडे निवेदेन दिले होते. त्याबाबत मंगळवारी (14) पाहणी झाली होती. बुधवारी मंजुरी मिळाली. स्वॅब सेंटरचे काम सुरू झाले. आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन कार्यवाहीसाठी अधिकारी वर्ग प्रत्यक्ष पाहणीसाठी येऊन सर्वसमावेशक जागा अंतिम करून पुढील दोन दिवसात शरदचंद्र पवार बहुद्देशीय भवन येथे स्वॅब सेंटर सुरू होणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com