रसिकांसाठी दुर्मीळ पुस्तके

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मे 2019

मोबाईल तंत्रज्ञानाच्या काळात आजही अनेक लोकांना पुस्तक वाचण्याची हौस असते. त्यामध्ये जुनी दुर्मीळ पुस्तके मिळाली तर पर्वणीच ! उत्कर्ष बुक सर्व्हिसमध्ये शंभर वर्षांपूर्वीची पुस्तके पुस्तकप्रेमींसाठी उपलब्ध झाली आहेत.

पुणे - मोबाईल तंत्रज्ञानाच्या काळात आजही अनेक लोकांना पुस्तक वाचण्याची हौस असते. त्यामध्ये जुनी दुर्मीळ पुस्तके मिळाली तर पर्वणीच ! उत्कर्ष बुक सर्व्हिसमध्ये शंभर वर्षांपूर्वीची पुस्तके पुस्तकप्रेमींसाठी उपलब्ध झाली आहेत.

उत्कर्ष बुक सर्व्हिसचे संचालक सु. वा. जोशी यांच्याकडे अनेक दुर्मीळ पुस्तके आहेत. दुर्मीळ, जुनी आणि महत्त्वाची पुस्तके लोकांपर्यंत पोचावीत यासाठी अनेक जण त्यांच्याकडे स्वतःची पुस्तके आणून देतात. असेच एक पुस्तकप्रेमी ए. एस. सराफ यांच्याकडे साधारण हजारो पुस्तके होती. ती वाचून झाल्यावर त्यांनी मृत्युपत्रात ‘ही पुस्तके उत्कर्ष सर्व्हिस बुकला देणे’ असे लिहून ठेवले. त्यांच्या मृत्यूनंतर ही हजारो पुस्तके जोशी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.

त्यामध्ये हजारो व विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश आहे. त्याचे औपचारिक प्रकाशन साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे व निवेदक सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते झाले. या आधी अनेक जणांनी स्वतःजवळ असणारी पुस्तके इतरांना वाचायला मिळावी या हेतून जोशी यांच्याकडे दिली आहेत. ही सर्व पुस्तके आहे त्याच किमतीमध्ये रसिकांसाठी उपलब्ध आहेत.

Web Title: Rare books for fame