रश्मी शुक्ला कोरेगाव भीमा चौकशी आयोगा समोर हजर

कोरेगाव भीमा चौकशी आयोगा समोर रश्मी शुक्ला यांची चौकशी सुरू आहे.
Rashmi Shukla
Rashmi Shuklaesakal
Summary

कोरेगाव भीमा चौकशी आयोगा समोर रश्मी शुक्ला यांची चौकशी सुरू आहे.

कोरेगाव-भीमा (Koregaon Bhima) येथील दंगल प्रकरणी पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi shukla) चौकशीसाठी कोरेगाव भीमा चौकशी आयोगा समोर हजर होणार आहेत. दरम्यान, कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर रश्मी शुक्ला यांची चौकशी सुरू झाली असल्याची माहिती समोर येत आहे. २०१८ मध्ये झालेल्या दंगलीत झालेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकारने याप्रकरणी माजी न्यायाधीश जे . एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.

Rashmi Shukla
भीमा कोरेगाव प्रकरण : रश्मी शुक्ला चौकशी आयोगापुढे हजर, पण...

दरम्यान, २०१८ मध्ये झालेल्या दंगलीत झालेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकारने या प्रकरणी कोलकाता हायकोर्टाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल (High court) यांच्या अध्यक्षतेखालील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या नेतृत्वाखालील चौकशी आयोग नेमला आहे. या आयोगाकडून सध्या शुक्ला यांची साक्ष नोंदवली जात आहे. दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनाही समन्स बजावण्यात आले होते, परंतू ते हजर झाले नाहीत. त्यावेळी सिंग हे अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) या पदावर होते. शुक्ला यांनी मात्र आयोगासमोर हजेरी लावली. तसेच शपथपत्र दाखल करण्यासाठी वेळ मागितला. या कार्यक्रमाबाबत पुणे पोलिसांकडून काही कागदपत्रे मिळणे बाकी असल्याचं यावेळी त्यांनी आयोगापुढं सांगितलं होतं.

काय आहे प्रकरण ?

पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव (Koregaon Bhima) या ठिकाणी एक विजयस्तंभ आहे, जो आंबेडकरी जनतेसाठी प्रेरणास्थान असून दरवर्षी १ जानेवारी रोजी या ठिकाणी लाखोंच्या संख्येने जनता अभिवादनासाठी येते. दरम्यान, ज्या ऐतिहासिक लढाईच्या स्मरणार्थ हा स्तंभ उभारला. त्या लढाईला १ जानेवारी २०१८ रोजी २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या ठिकाणी मोठा जनसमुदाय लोटला होता. याचवेळी या ठिकाणी हिंसाचार उसळला होता.

Rashmi Shukla
फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्ला यांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com