
राष्ट्र सेवा दल सामाजिक सलोखा सप्ताहाचा दि. ११ मे रोजी पंढरपूर मध्ये समारोप
इंदापूर : राष्ट्र सेवा दलाच्या सामाजिक सलोखा सप्ताहाचा समारोप दि. ११ मे रोजी पंढरपूर येथे समता दिंडीने होणार असून यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, सामान्य प्रशासन राज्य मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे,राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त आमदार कपिल पाटील,राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, जेष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा, सेवा दलाचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन कोकाटे, महाराष्ट्र सचिव नवनाथ गेंड यांवेळी उपस्थिती रहाणार असल्याची माहिती राष्ट्र सेवा दलाचे राज्य संघटक गफूर सय्यद व प्रा. कृष्णा ताटे यांनी दिली.
गफुर सय्यद पुढे म्हणाले, दि.१ मे १९४७ ते १० मे १९४७ या कालावधीत विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले करण्यासाठी साने गुरुजी यांनी अमरण उपोषण केले होते. त्यानंतर १० मे १९४७ रोजी विठ्ठल मंदिर हे सर्वांसाठी खुले करण्यात आले. या घटनेस ७५ वर्षे पूर्ण झाले आहे. या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राष्ट्र सेवा दलाच्या वतीने दि.१ मे २०२२ ते १० मे २०२२ या कालावधीत देशातसामाजिकसलोखा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहा दरम्यान समाजामध्ये जनजागृती करण्यात आली. दि.११ मे रोजी या सप्ताहाची सांगता पंढरपूर समता दिंडीने होणार आहे.
Web Title: Rashtra Seva Dal Social Reconciliation Closing In Pandharpur 11th May
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..